आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाब मलिक अटक प्रकरण:नवाब मलिक फोडणार होते हायड्रोजन बाँम्ब! भाजपचे सत्य बाहेर येईल म्हणून वडीलांना अटक, मुलगी निलोफर मलिक यांचा दावा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून भाजपने रान पेटविले. आता नवाब मलिक यांच्या मुलीने एक जूना व्हिडिओ ट्विट केला. नवाब मलिक विधानसभा अधिवेशनात हायड्रोजन बाँम्ब फोडणार होते, पण भाजपचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध व इतर सत्य बाहेर येईल म्हणून वडीलांना अटक केली असा दावा नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनी केला आहे.

हायड्रोजन बॉम्ब फोडल्यावर व माझ्याकडील सीडी बाहेर काढल्यावर भाजप नेत्यांची अवस्था वाईट होईल, असे मलिक बोलत असल्याचे व्हिडिओत दिसते. भाजप नेत्यांचे बिंग फोडण्याची भाषा ते करीत आहेत.

मी हायड्रोजन बाँम्ब अजून फोडला नाही. तो तसाच ठेवलेला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पाऊल मागे घेतले. हा बाँम्ब मी विधानसभेत फोडणार आहे. अंडलवर्ल्डशी कुणाचे संबंध हे मला माहित आहे, असेही ते भाजपला उद्देशुन बोलत असल्याचे व्हिडिओत दिसतात.

भाजप तोंडही दाखवु शकणार नाही

भाजप नेत्यांचे अंडरवर्ल्डशी कसे संबंध आहेत, याची माहिती माझ्याकडे आहे, असेही मलिक या व्हिडिओत सांगत आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे. माझ्याकडील सीडी बाहेर काढल्यानंतर भाजपवाले तोंडही दाखवु शकणार नाही असेही प्रकरणे माझ्याकडे आहेत. फक्त थोडी वाट पाहा असेही या व्हिडिओत ते म्हणत आहेत.

यावर प्रतिक्रीया देताना भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले की, राष्ट्रवादीने ही खोटी वटवट बंद करा असे म्हणत त्यांनी हे आरोप फेटाळले तसेच भाजपच्या कोणत्या नेत्याचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत त्याचे पुरावे द्यावे असे आव्हानही भातखळकर यांनी दिले आहे.

सीडीच्या भीतीमुळे भाजपने मलिकांना अडकवले- अमोल मिटकरी

भाजप नेत्यांचे कारनामे बाहेर येईल या भितीने मलिकांना अटक करण्यात आली आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या नेते अमोल मिटकरी यांनी केला. 2 डिसेंबर 2021 चे नवाब मलिक यांचे भाषण होते, तेव्हापासून भाजपमध्ये अस्वस्थता होती. ते हायड्रोजन बाँम्ब टाकणार होते. नवाब मलिकांकडे सर्व पुरावे आहेत, असा दावा अमोल मिटकरींचा आहे.

म्हणून माझ्या वडीलांना अटक निलोफर मलिक

भाजपने केद्रींय यंत्रणाचा वापर करुन वडीलांना आत टाकले आहे. ते विधानसभेत भाजपचे अंडरवर्ल्डचे संबंध उघड करणार असल्याने ही कारवाई त्यांच्यावर केली असे निलोफर मलिक यांचा दावा आहे. याबाबतचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...