आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्त वसुली संचालयाने अटक केलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षाने रान उठविले आहे. निदान त्यांचा कार्यभार तरी काढून घ्या अशी मागणी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे दिसते. त्यांनी बोलविलेल्या बैठकीत नवाब मलिक यांचा राजीनामा न घेता कार्यभार दुसऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे.
परभणीत धनंजय मुंडे व गोंदीयात प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पालकमंत्री पदाचा देणार येणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सायंकाळी स्पष्ट केले. अल्पसंख्याक खात्याचा कारभारही दुसऱ्यांकडे दिला जाणार असून मुख्यमंत्र्यांशी बोलुन अंतीम निर्णय घेणार आहोत असेही ते म्हणाले.
नवाब मलिक यांचा मुंबई अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार महानगर पालिकेतील गटनेत्या राखी जाधव तसेच नरेंद्र राणे यांच्याकडे दिला जाणार आहे.
मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली असून प्रकरण अजूनही न्यायालयात आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या प्रमुख नेते आणि मंत्र्यांची बैठक बोलावली होती.
आज सकाळपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठका सुरू आहे. त्यात आज संध्याकाळी राष्ट्रवादीच्या मोजक्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
प्रफुल पटेल, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह सुप्रिया सुळे बैठकीत हजर होते. या बैठकीमध्ये मुंबई कार्यकारी अध्यक्ष नियुक्ती, नवाब मलिक राजीनामा, पेनड्राईव्ह प्रकरणात राष्ट्रवादी नेत्यांची नावे आल्याने पुढील रणनीती ठरवण्यात आली आहे.
नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली होती. पण, मलिक यांचे प्रकरण हे भाजपने मुद्दामहुन काढले आहे. त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नसल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले व मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीने फेटाळून लावली होती. त्यानंतर भाजप नेते अधिकच आक्रमक झाले होते. त्यानंतरही शरद पवार राजीनामा न घेण्याच्या निर्णयावर शरद पवार ठाम होते.
बैठकीत यावर मंथन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.