आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रग्स केस:राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला 8 तासाच्या चौकशीनंतर NCB ने केली अटक, ड्रग पेडलर्सशी आढळले संबंध

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात जाताना समीर खान - Divya Marathi
चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात जाताना समीर खान
  • आता मलिक यांनी ठाकरे सरकारमधून पायउतार व्हावे, किरीट सोमय्यांची मागणी

मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर त्याबाबतची पोस्ट करून माहिती दिली आहे. मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) समन्स बजावले होते. याप्रकरणी त्यांची सकाळपासून चौकशी सुरु होती. 8 तासांच्या चौकशीनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) समीर खान यांना अटक केली आहे.

आता मलिक यांनी ठाकरे सरकारमधून पायउतार व्हावे, किरीट सोमय्यांची मागणी

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्याबाबतचे ट्विट करून माहिती दिली आहे. नवाब मलिक यांचे जावई आणि ‘ड्रग्जचा लॉर्ड’ समीर खान यांना एनसीबीने अटक केली आहे. आता मलिक यांनी ठाकरे सरकारमधून पायउतार व्हावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

ड्रग पॅडलरला दिले होते 20 हजार

200 किलो ड्रग्स रिकव्हरी प्रकरणात एनसीबीला ब्रिटीश ड्रग पॅडलर करण सजनानी यांच्याकडून कॉन्टॅक्टची माहिती मिळाली होती. त्यांच्या तपासणीत 20 हजार रुपयांचा व्यवहारही उघडकीस आला. समीर खान यांनी हे पैसे ऑनलाईन अ‍ॅपद्वारे ट्रान्सफर केले होते. आज NCB एका ड्रग डीलरला पैसे का दिले गेले याची चौकशी करणार आहे. समीर खान यांचे लग्न नवाब मलिक यांची मुलगी निलोफरशी झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...