आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिकांची प्रकृती बिघडली:अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक जे. जे रुग्णालयात दाखल; ईडीकडून जामीन अर्जाला विरोध

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक गेल्या काही माहिने जेलमध्ये आहेत. त्यांची प्रक़ती बिघडल्याने स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खराब असल्याचे सांगत त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात येण्याचीही शक्यता आहे. नवाब मलिक यांच्या प्रकृतीचे कारण देत त्यांच्या वकिलांकडून जामीन अर्ज करण्यात आला. मात्र ईडीने जामीन अर्जाला विरोध केला आहे.

नवाब मलिकांची प्रकृती बिघडली

मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक केली आहे. यानंतर त्यांच्या रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. आज त्यांच्या तब्येतीमध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे त्यांना तातडीने कारागृहातून स्ट्रेचरवरून नेण्यात आले आहे.

नवाब मलिक यांना स्टेज दोनच्या क्रॉनिक किडनी रोगामुळे त्यांना पाय दुखणे आणि सूज येण्याची तक्रार करण्यात आली होती. तुरुंगात त्यांना वेदनाशामक औषध देण्यात आले होते, मात्र जे या रोगासाठी चांगले नाहीये असे रुग्णालयाने सांगितले आहे. जे.जे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना औषध दिले नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...