आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रग्ज प्रकरणात NCB अ‍ॅक्शनमध्ये:अटकेनंतर नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या वांद्र्याच्या घरी छापेमारी, मलिक म्हणाले- कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी समीर खान यांना 8 तासांच्या चौकशीनंतर NCB ने अटक केली होती

राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केल्यानंतर NCB चे एक पथक गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या वांद्रे येथील घरी छापेमारीसाठी पोहोचली. सूत्रांच्या माहितीनुसार NCB चे अधिकारी त्यांच्या पत्नीचीही चौकशी करत आहेत. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास समीर खान दक्षिण मुंबईतील बलार्ड इस्टेट येथील एनसीबी कार्यालयात पोहोचले होते. 8 तासांच्या चौकशी दरम्यान समीर खान आणि ब्रिटीश ड्रग पेडलर करण सजानी यांच्यात व्यवहार झाल्याची माहिती NCBला मिळाली.

नवाब मलिक म्हणाले- कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही

जावई समीर खान याच्या अटकेनंतर मंत्री नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही आणि कोणत्याही भेदभावाशिवाय त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. कायदा आपल्या ठरलेल्या वेळी पावले उचलेल आणि तेथे न्याय मिळेल. मला आपल्या न्यायपालिकेवर मोठा विश्वास असून मी आदर करतो.' असे मलिक यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले.

भाजप म्हणाले होते - नवाब मलिक यांनी उत्तर द्यावे

नवाब मलिक यांच्या जावयाला समन्स दिल्यानंतर भाजप नेता किरीट सोमय्या यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, "आता नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या चौकशीत NCP मंत्र्याचे जावई ड्रग्स प्रकरणात सामील असल्याचे समोर आले आहे. नवाब मलिक यांनी उत्तर द्यावे."

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser