आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या सलग आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली आहे. मलिक यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. त्यानंतर सकाळपासून त्यांची चौकशी सुरू होती.
दरम्यान, शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानी महत्त्वाची बैठक पार पडली आहे. भाजपने ज्या प्रकारे सरकारी तपास यंत्रणाचा वापर केला आहे. त्याला चोख उत्तर देण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहे.
सिल्व्हर ओकवरील बैठकीनंतर शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी दाखल झाले आहेत.
अनेक मंत्री, नेते होते उपस्थित
शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री हसन मुश्रीफ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री धनंजय मुंडे बैठकीस उपस्थित होते.
नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा- चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. राजीनामा नाही घेतला तर आंदोलन करु असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.