आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Nawab Maliok Ed | Marathi News | After Eight Hours Of Interrogation, Malik Was Given Eight Days In ED Custody; Will Not Resign, Explains Mahavikas Aghadi

नवाब कोठडीत:आठ तास चौकशीनंकर मलिकांना आठ दिवस ईडीची कोठडी; राजीनामा घेणार नाही, महाविकास आघाडीचे स्पष्टीकरण

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंडरवर्ल्डशी संबंध व मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणात ईडीचे पथक बुधवारी पहाटे साडेचार वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी धडकले. ईडी कार्यालयात ८ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक झाली. विशेष न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. या सर्व घटनाक्रमामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

कोर्टात ईडीने मलिक यांच्यावर टेरर फंडिंगचाही गंभीर आरोप केला आहे. ईडीने १४ दिवसांची त्यांची कोठडी मागितली, मात्र कोर्टाने ८ दिवसांची कोठडी दिली. वैद्यकीय तपासणीसाठी नेताना मलिक म्हणाले, ‘डरूंगा नहीं. हम लडेंगे और जीतेंगे.’ दरम्यान, वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांसह अनेक मंत्री उपस्थित होते. यात मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असे ठरले. अनिल देशमुख यांच्यानंतर ईडीने अटक केलेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत. मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात येत हाेते.

तेव्हा मलिक ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर हात उंचावून मुठ दाखवली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मलिकांनी ‘लढेंगे और जितेंगे... डरेंगे नही’, असे स्पष्ट केले. आपल्याला चौकशीची नोटीस देण्यात आली नव्हती, तसेच ईडी कार्यालयात आणल्यानंतर समन्सवर माझ्या सह्या घेतल्या अशी माहिती मलिक यांनी न्यायालयात दिली. मलिक यांची चौकशी सुरू असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅलार्ड पिअर येथील ईडी कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच मलिक यांना सत्र न्यायालयात नेल्यानंतर न्यायालयाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडी, भाजप आणि केंद्र सरकार यांच्या विरोधात घोषणा देत होते.

ईडीचे वकील म्हणाले
अॅड. अनिल सिंग यांनी युक्तिवाद करताना म्हणाले, दहशतवादी कृत्ये, बनावट नोटा चलनात आणणे, अवैध पैशांचा व्यवहार, हवाला, त्याचे लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-महंमद, अल-कैदा अशा अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशीही दाऊदचे संबंध होते. त्याची बहीण हसीना पारकर हिचाही गुन्ह्यात संबंध होता. कुर्ल्यामध्ये गोवावाला कंपाऊंड ही मालमत्ता हसीनाच्या मालकीची होती. हसीना पारकर चा साथीदार सलीम पटेलने मुखत्यारपत्राचा गैरवापर करत हसीना पारकरच्या नावे मालमत्ता विक्री व्यवहार केला आणि तीन कोटी ३० लाख रुपयांची मालमत्ता ५५ लाख रुपयांना नवाब मलिक यांच्या कंपनीला विकली.

मलिकांचे वकील म्हणाले
अॅड. अमित देसाई यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, मनी लाँड्रिंग कायदा नंतर आला. त्याच्या खूप आधी हा मालमत्ता व्यवहार झाला होता. सन १९९९ ते २००३ मधल्या व्यवहाराचा ईडी आता फेब्रुवारीमध्ये तपास करते आणि कायद्याच्या तरतुदी खूप जुन्या व्यवहारांना कलमे लावली गेली आहेत. मनी लाँड्रिंग कायद्याचा तपास यंत्रणेने गैरवापर चालवला आहे. ईडीच्या रिमांड अर्जाला काहीच आधार नाही. लोकप्रतिनिधीला, मंत्र्याला अटक करून त्याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी संबंध आहेत, असे चित्र तपास यंत्रणेकडून तयार केले गेले आहे.

परिणाम : आघाडी प्रत्युत्तराच्या तयारीत

राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन करण्यात भाजप यशस्वी, शिवसेनेच्या नेत्यांची अस्वस्थता वाढली.महाविकास आघाडीत तणाव. राज्याच्या तपास यंत्रणांद्वारे भाजपच्या नेत्यांवर कारवाई हाेणे शक्य.

ईडीकडील पुरावे : तक्रारी, दस्तऐवज
या दाेन खरेदीपत्रांचे विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले पुरावे, चार मालमत्तांच्या संशयित व्यवहारांची तक्रार, दाऊद गँगच्या मुंबईत १० मालमत्तांवरील ईडीच्या छाप्यातील धागेदाेरे.

प्रकरण : दाऊदचा पैसा गुंतवला
मलिकांच्या साॅलिड्स कंपनीने मुंबई स्फाेटातील शहावली खान, दाऊदची बहीण हसीना, त्यांचा निकटवर्तीय सलीमकडून कुर्ल्यात जमीन खरेदी केल. दाऊद गँगचा बेनामी पैसा मालमत्तेत वळवला.

१०० काेटी वसुली
मुंबई परिसरातील बारमालकांकडून १०० काेटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याची तत्कालीन पाेलिस आयुक्त परमबीर सिंग यांची तक्रार.

दावा : एप्रिलनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट?
या सर्व घटनाक्रमावर प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका नेत्याने सांगितले की, १० मार्चनंतर म्हणजे ५ राज्यांच्या निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची जोराची तयारी होत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाद इतका विकोपाला जाईल की राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे करून राष्ट्रपती राजवट लादली जाईल. त्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होतील, असा दावाही या नेत्याने केला आहे.

मंत्री मलिक यांनी अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन खरेदी केली. बॉम्बस्फाेट खटल्यातील अाराेपीला १० लाख रुपये दिले आहेत. आघाडी सरकार कसे खोटे पुरावे गोळा करते, याचा मी खुलासा करणार आहे. 23 फेब्रुवारीस पहाटे ४.३० ला मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी पाेहाेचले. ८ तास चाैकशीनंतर दुपारी ३ ला अटक. ६ तास काेर्टात सुनावणी. रात्री ९ : ईडी काेठडी.

तपास यंत्रणांचा गैरवापर
नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई होणार असल्याची पुसट कल्पना होती. आमच्यासाठी हे आश्चर्यकारक नाही. जे जाहीरपणाने बोलतात त्यांच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे.- शरद पवार

बातम्या आणखी आहेत...