आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरमानला बेड्या:अभिनेता अरमान कोहलीला ड्रग्ज प्रकरणात अटक, छापेमारी दरम्यान एनसीबीला अभिनेत्याच्या घरातून मिळाले होते ड्रग्ज

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता अरमान कोहलीला ड्रग प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली आहे. त्याला आज नगर न्यायालयात हजर केले जाणार आहे. तपास यंत्रणेने शनिवारी त्याच्या मुंबईतील घराची झडती घेतली होती, जिथे टीमला ड्रग्ज सापडली.

अहवालांनुसार, ड्रग पॅडलरला एनसीबीने अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतरच अरमानविषयी माहिती मिळाली. यानंतर एनसीबीने अरमानच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

अरमान कोहली बिग बॉसच्या 7 व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सामील झाला होता. घरातल्या रागाच्या वागण्यामुळे त्याला काही दिवसांसाठी हद्दपारही करण्यात आले. या छाप्यापूर्वी एनसीबीने टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितला शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. शनिवारी दुपारी एनसीबीने त्याला मुंबईच्या एनडीपीएस न्यायालयात हजर केले, सुनावणीनंतर त्याला 30 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोहली यापूर्वीही सापडला आहे वादात

बिग बॉस शोमध्ये सहभागी झालेल्या अरमान कोहलीला उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्याच्या घरातून महागड्या स्कॉच व्हिस्कीच्या 41 बाटल्या जप्त करण्यात आल्या. नियमानुसार, कोणतीही व्यक्ती दारूच्या 12 पेक्षा जास्त बाटल्या घरी ठेवू शकत नाही.

मैत्रिणीला मारहाण केल्याचा आरोपही होता

याआधी जून 2018 मध्ये कोहलीवर त्याच्या लिव्ह-इन गर्लफ्रेंड नीरू रंधावाला अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये एका महिला फॅशन डिझायनरसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. कोहली त्याच्या कारकिर्दीत तीन वेळा जेलच्या मागे गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...