आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता गौरव दीक्षितला अटक:NDPS कोर्टाने 30 ऑगस्टपर्यंत सुनावली कोठडी, घरातून जप्त करण्यात आले एमडी ड्रग्स; मुंबईतील 5 ठिकाणी एनसीबीचा छापा सुरू

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • छापा टाकल्यापासून बेपत्ता होता गौरव

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात एनसीबीने मोठी कारवाई करत अभिनेता गौरव दीक्षितला शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. एनसीबीने आज दुपारी गौरवला मुंबईतील एनडीपीएस न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर एनडीपीएस न्यायालयाने 30 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, एनसीबी गौरवच्या चौकशीच्या आधारे मुंबईतील मुलुंड, खारघर, वसई, विरार, वांद्रे आणि अंधेरी भागात छापेमारी करत आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती छापेमारी
अभिनेता गौरव दीक्षितच्या घरातून काही दिवसांपूर्वी एमडी ड्रग्स आणि चरस जप्त करण्यात आले होते. एनसीबीचे पथक काही वेळातच गौरवला स्थानिक NDPS कोर्टात सादर करेल. ही अटक अभिनेता एजाज खानच्या चौकशीच्या आधारे करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. एजाज खानला 31 मार्च रोजी मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली होती.

अभिनेता एजाज खानच्या चौकशीनंतर एनसीबी मुंबईच्या विविध भागात छापेमारी करत आहे. दरम्यान, या छापेमारीत दीक्षितच्या घराव्यतिरिक्त अंधेरी आणि लोखंडवालाच्या अनेक ठिकाणांचा समावेश आहे. ड्रग्स तस्कर शादाब बटाटाच्या चौकशीतून एजाज खानचे नाव समोर आले होते. त्यानंतर तपास यंत्रणेने एजाज खानची चौकशी करत त्याचे बयान नोंदवले. अभिनेता गौरव दीक्षितचे नाव याच चौकशीतून समोर आले होते.

छापा टाकल्यापासून बेपत्ता होता गौरव
एनसीबीने बॉलीवूड ड्रग्स प्रकरणात अनेक ठिकाणी छापेमारी केली. दरम्यान, एनसीबीने 5 महिन्यांपूर्वी गौरव दीक्षितच्या घरीही छापेमारी केली. या छापेमारीत एक लॅपटॉप आणि ड्रग्स जप्त करण्यात आले. गौरव एका विदेशी महिलेसोबत त्या फ्लॅटमध्ये राहायचा. परंतु, छापेमारी दरम्यान तो आपल्या गर्लफ्रेन्डला घेऊन फरार झाला. झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी याबाबत पुष्टी दिली आहे. ते म्हणाले की, ज्या पुरवठादाराच्या इशाऱ्यावर एजाज खान पकडला गेला होता. त्याने गौरव दीक्षितचे नावही घेतले होते. एनसीबीच्या पथकाला पाहताच गौरव दीक्षित आणि त्याची डच गर्लफ्रेंड तेथून पळून गेले होते.

बातम्या आणखी आहेत...