आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाऊदच्या गुंडाला अटक:NCB ने कोट्यवधींचे अमली पदार्थ आणि रोख रकमेसह हाजी मस्तानचा नातेवाईक चिंकू पठाणला केली अटक, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्ते जप्त

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण मुंबईत नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार गॅंगस्टर परवेझ खान उर्फ ​​चिंकू पठाण याला नवी मुंबई येथून अटक केली आहे. त्याच्या अनेक ठिकाणांवर रात्री उशिरा छापा टाकण्यात आला. यावेळी NCB वा त्याच्याकडे शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला आहे. चिंकू अमली पदार्थांची तस्करी करत होता, त्याच्याकडे कोट्यावधी रुपयांचे ड्रग्स जप्त केली आहेत. NCB चिंकूबाबत आज मोठा खुलासा करू शकते. त्याला थोड्याच वेळात कस्टडीसाठी NDPS न्यायालयात हजर केले जाईल.

चिंकू करीम लालाचा नातेवाईक आहे

चिंकू खान, माफिया डॉन करीम लालाचा नातेवाईक आहे, जो 1960 ते 1980 पर्यंत सक्रिय होता. गोपनीय माहितीच्या आधारे NCB कर्मचाऱ्यांनी परवेझ खानला त्याच्या ठिकाणावरून अटक केली. NCB च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या परवेज खान विरुद्ध NDPS अंतर्गत काही प्रकरणे प्रलंबित आहेत.

चार फॅक्ट्रीत टाकली धाड

चिंकू पठाणच्या चार ड्रग्सच्या फॅक्ट्रींवर रात्री उशिरा धाड टाकण्यात आली आणि येथून NCB ने कोट्यवधी रुपये रोख, अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगच्या निधनानंतर, एनसीबीने मुंबईतील ड्रग माफियांच्या विरोधात कारवाई सुरूच ठेवली आहे. आजची कारवाई देखील त्यातील एक भाग आहे.

अशाप्रकारे चिंकूपर्यंत पोहोचले पोलिस

स्ट्रीट पेडलर जुनैद खानने अटकेनंतर चिंकूचे नाव घेतले होते, त्यानंतर NCBने त्याच्या ठिकाण्यांवर छापेमारी केली. जुनैदला NCB मुंबईच्या पायधोनी भागातून मेफड्रॉन नावाच्या ड्रग्ससह अटक केली होती. 2019 मध्येही मुंबईच्या डोंगरी पोलिसांनी चिंकू पठाणला 30 लाख रुपयांच्या प्रतिबंधीत अमली पदार्थांसह अटक केली होती. त्या भागात चिंकू पठाणला मोठ्या प्रमाणात लोक पाठबळ मिळाल्यामुळे पोलिसांना त्यावेळी मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला.