आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत ड्रग्ज:एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आपला सर्वात खास अधिकारी आणला, मलिक म्हणाले - वानखेडे दिशाभूल करत आहेत

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रूझ ड्रग्ज प्रकरण आणि मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या अटकेसह एकूण 6 खटले आता एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या हातून काढून घेतले आहेत. आता एनसीबीचे डीडीजी, ऑपरेशन संजय सिंह या प्रकरणांची चौकशी करतील. या प्रकरणांतून समीर वानखेडे यांना हटवण्यात आले नसले तरी ते या प्रकरणांमध्ये आयपीएस संजय सिंह यांना सहकार्य करत राहणार आहेत. एनसीबीच्या मुंबई शाखेनेही अधिकृत निवेदनात याला दुजोरा दिला आहे.

NCBने संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली आहे. ही टीम आज दिल्लीहून मुंबईत पोहोचत आहे. नवाब मलिक यांनी एनसीबीवर केलेल्या आरोपांनंतर एनसीबीने आपली विश्वासार्हता वाचवण्यासाठी आपल्या अत्यंत धडाडी अधिकाऱ्याला मैदानात उतरवले असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात आता आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एनसीबीचे उपमहासंचालक (उत्तर-पश्चिम विभाग) मुथा अशोक जैन यांनी सांगितले की, ही कारवाई प्रशासकीय कारणास्तव करण्यात आली आहे आणि या सहा प्रकरणांमध्ये व्यापक आणि आंतरराज्य परिणाम असल्याने त्यांना दिल्लीतील ऑपरेशन युनिटमध्ये हलवण्यात आले आहे. वैयक्तिक आणि सेवेशी संबंधित अनेक आरोपांचा सामना करणारे वानखेडे हे झोनल डायरेक्टर म्हणून कायम राहणार आहेत.

संजय सिंह हे ड्रग्जच्या बाबतीत तज्ज्ञ मानले जातात
संजय सिंह हे 1996 च्या बॅचचे ओडिशा कॅडरचे वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांची ओडिशा पोलिसात अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर त्यांना ओडिशा पोलिसातच आयजीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांचे काम पाहून सरकारने त्यांची सीबीआयमध्ये डीआयजी म्हणून नियुक्ती केली.सध्या ते एनसीबीच्या ADG (ऑपरेशन्स) पदावर आहेत. संजय सिंह यांनी अनेक मोठ्या ड्रग्ज प्रकरणांचा तपास केला आहे. त्यांना ड्रग्ज केस एक्सपर्ट असेही म्हणतात. त्यांनी ओडिशा आयुक्तालयात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचेही नेतृत्व केले आहे.

वानखेडेंचे स्पष्टीकरण
'मला चौकशीतून काढून टाकण्यात आलेले नाही. या प्रकरणाची केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी व्हावी, अशी मीच न्यायालयाला विनंती केली होती तशी याचिका दिली होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाची दिल्ली एनसीबीची एसआयटी चौकशी करत आहे, असा दावा समीर वानखेडे यांनी केला आहे.

नवाब मलिक म्हणाले - वानखेडे दिशाभूल करत आहेत
वानखेडे यांच्या या वक्तव्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे की एकतर ANI (वृत्तसंस्था) समीर वानखेडे यांना चुकीच्या पद्धतीने कोट करत आहे किंवा समीर वानखेडे देशाची दिशाभूल करत आहे.

बातम्या आणखी आहेत...