आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत नार्कोटिक्स टीमवर गोळीबार:तस्करांना पकडण्यासाठी गेलेले 5 अधिकारी जखमी, एक गंभीर; 1 कोटींच्या ड्रग्जसह परदेशी तस्कराला बेड्या

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या पथकावर गुरुवारी रात्री उशिरा ड्रग्ज तस्करांच्या टोळीने हल्ला केला. या हल्ल्यात एनसीबीचे पाच अधिकारी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. मात्र, कारवाईदरम्यान एनसीबीने दोन परदेशी तस्करांना एक कोटी किमतींच्या ड्रग्जसह पकडले आहे.

एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी शुक्रवारी सांगितले की, गुप्त माहितीद्वारे टीमने वाशी परिसरातील एका अड्ड्यावर छापा टाकला होता. छाप्यादरम्यान, एनसीबी टीमवर ड्रग तस्करांनी हल्ला केला. मात्र, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी या रॅकेटच्या गुंडाला पकडले. असे सांगितले जात आहे की याच तस्कराने एनसीबी टीमवर गोळीबार केला होता.

मानखुर्द ते वाशी जंगल बनले तस्करांचा अड्डा
समीर वानखेडे यांनी सांगितले की, मानखुर्द ते वाशी दरम्यानच्या जंगल परिसरात एक मोठे ड्रग्ज रॅकेट चालत होते. संध्याकाळी या ठिकाणी ड्रग्जचा बाजार भरायचा. एनसीबीने माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही एक आफ्रिकन टोळी आहे, जी भारतात बेकायदेशीरपणे राहत असताना ड्रग्ज रॅकेट चालवत होती.

गोळीबार करुन काही तस्कर फरार
हल्ल्यादरम्यान काही तस्करांना घटनास्थळावरून पळ काढण्यात यश आले आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. फरार आरोपींकडे विदेशी शस्त्रे असल्याची माहितीही मिळाली आहे. या कारवाईत एमडी, हिरोइन आणि कोकेन देखील जप्त करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...