आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • NCB On Raid Politics| 14 People Were Detained For Questioning | 6 Were Freed After No Evidance Of Drugs Indulgence Found Says NCB After Nawab Malik Allegations

NCP च्या आरोपांना NCB चे उत्तर:चौकशीसाठी नेलेल्या 6 जणांना सोडले! त्यांच्या विरोधात पुरावे नव्हते, पूर्वग्रहदूषित आरोप लावून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न -NCB

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • NCB ने क्रूझवर धाडीनंतर 14 जणांना चौकशीसाठी नेले होते
  • 8 जणांच्या विरोधात सबळ पुरावे, 6 जणांच्या विरोधात पुरावे नव्हते

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लावलेले आरोप अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (NCB) ने स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. एनसीबीवर आरोप हे पूर्वग्रह दूषित मताने करण्यात आले असून त्यात काहीच तथ्य नाही. NCB चे उप महासंचालक ज्ञानेश्वर मिश्र यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.

संपूर्ण कारवाई नियमांना धरुनच
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रश्नांची उत्तरे दिली. त्यात एनसीबीने सांगितल्याप्रमाणे, क्रूझ पार्टीवर धाड टाकल्यानंतर जी कारवाई झाली ती नियमाने आणि रेकॉर्डमध्ये ठेवूनच करण्यात आली आहे. या कारवाईची संपूर्ण माहिती सुद्धा न्यायालयात सुपूर्द करण्यात आली. आणखी काही माहिती असेल तर ती सुद्धा कोर्टात सादर केली जाईल.

धाडीत आम्ही विटनेस ठेवत असतो
एनसीबीकडून कुठलीही कारवाई एका माहितीच्या आधारावरच केली जाते. ही माहिती आम्हाला जनतेच्या माध्यमातून किंवा आमच्या सूत्रांकडून मिळत असते. नियमानुसार, आम्ही रेड टाकल्यानंतर दोन प्रत्यक्षदर्शींना सामिल करून घेतो. या संपूर्ण प्रक्रियेत 9 इंडिपेंडेन्ट विटनेस समाविष्ट करण्यात आले होते. धाड नियमांचे पालन करूनच टाकण्यात आली.

6 जणांच्या विरोधात पुरावे नव्हते म्हणून सोडले
NDPS कायद्याच्या कलम 67 नुसार, आम्ही 14 जणांना चौकशीसाठी एनसीबी कार्यलयात घेऊन गेलो होतो. त्यातील 6 जणांच्या विरोधात कुठल्याही प्रकारचे पुरावे सापडले नाहीत. अशात आमच्यावर करण्यात आलेले आरोप हे पूर्वग्रहदूषित असून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्याकडे आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. त्यांना अटक केल्यानंतर 1 लाख 33 हजार रुपये जप्त करण्यात आले.

विटनेसचे बॅकग्राउंड चेक करणे नेहमी शक्य नसते
दरम्यान, या रेडमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा सामिल होते. त्यांच्याच इशाऱ्याने ही कारवाई झाली असे आरोपही झाले. एवढेच नव्हे, तर आरोपींनी घेऊन जाताना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे फोटो देखील व्हायरल झाले. त्यावर बोलताना, अशा प्रकारचे ऑपरेशन रियल टाइम केले जातात. त्यामुळे विटनेस म्हणून सामिल करण्यात आलेल्या लोकांचा बॅकग्राउंड चेक करणे शक्य नसते. आम्ही पुराव्यांच्या आधारेच 8 जणांना अटक केली. तर 6 जणांच्या विरोधात पुरावे नसल्याने सोडून दिले असे एनसीबीने स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...