आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्यनच्या जामीनाला आव्हान:आर्यन खानच्या जामीनाविरुद्ध आता सुप्रीम कोर्टात जाणार NCB; हायकोर्टाने म्हटले होते आर्यनच्या विरोधात पुरावेच नाहीत

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्यन खान प्रकरणात तोंडघशी पडलेली नार्कोटिक्स नियंत्रण संस्था NCB आता सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आर्यनच्या जामीनाला एनसीबी आव्हान देणार आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ते कोर्टाच्या सविस्तर आदेशाची वाट पाहत होते. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.

एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी एका क्रूझ शिपवर धाड टाकली. यानंतर 3 ऑक्टोबर रोजी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. 28 ऑक्टोबर रोजी हायकोर्टाने आर्यनला सशर्त जामीन दिला होता. परंतु, त्याचा तपशील समोर आलेला नव्हता. मुंबई उच्च न्यायलायाचे न्यायमूर्ती एन डब्लू सांब्रे यांनी 28 ऑक्टोबरलाच आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचाही जामीन अर्ज स्वीकारला होता.

यानंतर शनिवारी हायकोर्टाने जामीनाच्या आदेशाची सविस्तर माहिती जारी केली. त्यानुसार, आर्यन खानच्या विरोधात NCB कडे कुठलेही पुरावे नाहीत. आर्यन खानने इतरांसोबत मिळून प्रतिबंधित ड्रग्जचे सेवन करण्यासाठी षडयंत्र रचल्याचा पुरावा नाही. एवढेच नव्हे तर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात आर्यनचे चॅट दाखवले होते त्यालादेखील पुरावा मानण्यास कोर्टाने नकार दिला.

आर्यनकडे ड्रग्ज सापडलेले नाही
कोर्टात आर्यन खानची बाजू मांडताना माजी महाधिवक्ते मुकुल रोहतगी यांनी सांगितले होते, की आर्यन खानला ताब्यात घेण्यासाठी एनसीबीकडे कोणतेही कारण नव्हते. आर्यनकडे कुठल्याही प्रकारचे प्रतिबंधित ड्रग्ज सापडलेले नाही. त्यामुळे आर्यनला करण्यात आलेली अटकच चुकीची आहे. एवढेच नव्हे, तर आर्यन तरुण असून त्याला सुधारगृहात पाठवले जाऊ शकते असेही रोहतगी म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...