आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट:आर्यन खान केसमधील सर्वात मोठा साक्षीदार प्रभाकर साईलचा हृदयविकाराने मृत्यू, NCB अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा केला होता आरोप

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणातील एनसीबीचे पंच आणि साक्षीदार प्रभाकर साईल यांचे रात्री उशिरा निधन झाले. साईलचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील माहुल भागातील त्यांच्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने प्रभाकर यांचे निधन झाले. प्रभाकर साईल यांचे पार्थिव आज सकाळी 11 वाजता त्याच्या अंधेरी येथील दुसऱ्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानला सोडण्यासाठी प्रभाकर यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे आणि केपी गोसावी यांच्यावर 25 कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला होता.

त्यांच्या आरोपानंतर या प्रकरणात एनसीबीची एसआयटी टीम दाखल झाली आणि समीर वानखेडे यांना या प्रकरणातून वेगळे करण्यात आले. प्रभाकर यांच्या आरोपाच्या आधारे महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनीही समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. प्रभाकर यांच्या मृत्यूनंतर आता पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत येऊ शकतो.

प्रभाकर साईलच्या आरोपानंतर एनसीबीच्या एसआयटी पथकाने किरण गोसावी (उभे) आणि समीर वानखेडे (बसलेले) यांची चौकशी केली होती.
प्रभाकर साईलच्या आरोपानंतर एनसीबीच्या एसआयटी पथकाने किरण गोसावी (उभे) आणि समीर वानखेडे (बसलेले) यांची चौकशी केली होती.

प्रभाकरने केला होता हा आरोप
आर्यन ड्रग्ज प्रकरणात प्रभाकर NCBचे स्वतंत्र साक्षीदार होते. छापेमारीच्या वेळी आपणही क्रूझवर उपस्थित असल्याचा दावा त्यांनी केला होता. प्रभाकर यांनी दावा केला होता की, एनसीबीने त्यांच्याकडून पंचनामा पेपर सांगून कोऱ्या कागदावर बळजबरीने सह्या करून घेतल्या होत्या. त्यांना आर्यन किंवा इतर कोणाच्या अटकेबद्दल माहिती नव्हती.

प्रभाकर यांनी आरोप केला होता की, गोसावीला फोनवर डिसुझाकडून 25 कोटींच्या मागणीबाबत फोनवर बोलताना ऐकले होते आणि हे प्रकरण 18 कोटींवर निश्चित झाले होते. कारण त्यांना 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना द्यायचे होते.

बातम्या आणखी आहेत...