आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानहानीचा दावा:समीर वानखेडेंच्या वडिलांनी नवाब मलिकांविरोधात दाखल केला मानहानीचा दावा, 1.25 कोटी रुपयांची मागणी

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक नवाब मलिक यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. आता समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात 1.25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे.

नवाब मलिक हे सातत्यायने समीर वानखेडेंवर नवनवीन आरोप करत आहेत. ट्विटर आणि पत्रकार परिषदांमधून ते सातत्याने आरोप करत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर त्यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. प्रसारमाध्यम, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी घातली जावी यासाठी ज्ञानदेव वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आहे. अर्शद शेख हे त्यांचे वकील आहेत. सोमवारी याविषयी सुनावणी होणार आहे.

या प्रकरणाविषयी वानखेडेंचे वकील अर्शद शेख म्हणाले की, 'नवाब मलिकांनी वानखेडेंच्या कुटुंबावर फसवणुकीचा आरोप केला होता. तसेच त्यांच्या धार्मिक श्रद्धांवर प्रश्न देखील उपस्थित केले. ते हिंदू नाही तर मुस्लीम असल्याचे ते म्हणाले. तसेच वानखेडे कुटुंबातील प्रत्येक जण खोटारडा असल्याचा आरोप त्यांनी केला. समीर वानखेडेंच्या बहिण यास्मिन या वकील असून त्या प्रॅक्टिस करत आहेत, त्या फौजदारी वकील आहेत त्यांचा अंमली पदार्थांच्या प्रकरणाची काहीच संबंध नाही. त्याच्यावर देखील मलिकांकडून आरोप केले जात आहेत. मलिकांनी वानखेडे कुटुंबाचे चारित्र्य, नाव आणि प्रतिष्ठेला नुकसान पोहोचवण्याचे काम केले आहे' असे या दाखल केलेल्या दाव्यामध्ये म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...