आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिकांना पाठिंबा:'पण लक्षात ठेवा...पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादी गडी', अमोल कोल्हेंचा नवाब मलिकांना पाठिंबा

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांची आज ईडीकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान या चौकशीविरोधात राष्ट्रवादीकडून निषेध व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल कोल्हे यांनी या चौकशीविरोधात भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर कविता शेअर करत नवाब मलिकांना पाठिंबा दर्शवला आहे.

भाजपच्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यावर सातत्याने निशाणा साधला जात आहे. भाजपकडून किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर विविध आरोप करताना दिसत आहे. दरम्यान आज ईडीने नवाब मलिकांना अचाकन चौकशीसाठी नेले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर एक कविता शेअर करून नवाब मलिकांना पाठिंबा दर्शवला आहे.

सत्तेच्या माडीसाठी

ईडीची शिडी

विनाकारण मारी

धाडीवर धाडी

सलते सत्तेवरील

​​​​​​​ महा-आघाडी

म्हणून कमळाबाई

​​​​​​​ ती लाविते काडी

तपासयंत्रणा झाल्या

कमळीच्या सालगडी

​​​​​​​ पाकळ्यांमध्ये नाहीत का

काहीच भानगडी?

पण लक्षात ठेवा...

पुरून उरेल सर्वांना

रांगडा राष्ट्रवादी गडी

मलिकांची ईडीकडून चौकशी
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी अचानकपणे नेले असल्याची माहिती आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...