आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जेलमधील मुक्काम पुन्हा वाढला आहे. अनिल देखमुख यांच्या मंजूर केलेली जामिनावरील स्थगिती हायकोर्टाने वाढवली आहे.
सीबीआयची विनंती मान्य
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या जामिनावरील स्थगिती हायकोर्टाने वाढवून सीबीआयची विनंती हायकोर्टाने मान्य केली आहे. जामीन मंजूर केल्याच्या निकालाला मंगळवारपर्यंत स्थगिती दिली त्यामुळे जामीन मंजूर होऊनही अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम पुन्हा वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयातील आव्हानावर 27 डिसेंबरपर्यंत सुनावणी करुन घेण्यासाठी सीबीआय प्रयत्नशिल असेल.
27 डिसेंबरपर्यंत स्थगिती वाढवली
अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला होता. परंतु, सीबीआयच्या विरोधानंतर न्यायालयाने दहा दिवसांसाठी म्हणजे 22 डिसेंबरपर्यंत जामीनाला स्थगिती दिली होती. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत ही स्थगिती 27 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा जेलमधील मुक्काम पुन्हा वाढला आहे.
हायकोर्टात घेतली होती धाव
मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामीनाला सीबीआयच्या विरोधानंतर न्यायालयाने दहा दिवसांसाठी म्हणजे 22 डिसेंबरपर्यंतल जामीनाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती वाढवण्यासाठी सीबीआयने हायकोर्टात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात यंदा सुट्टीकालीन कोर्ट उपलब्ध नसल्यामुळे 3 जानेवारीपर्यंत स्थगिती वाढवण्याची सीबीआयकडून विनंती करण्यात आली. त्यानंतर काल दुपारी अडीच वाजता न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे सीबीआयने आपला अर्ज तातडीच्या सुनावणीसाठी सादर केला. मात्र यावर काल सुनावणी झाली नाही.
तूर्त सुटका नाही
यावर उद्या म्हणजे आज सुनावणी होईल असे कोर्टाने म्हटले होते. त्यानुसार आज सुनावणी झाली आणि 27 डिसेंबर पर्यंत जामीनावरील स्थगिती वाढवण्यात आली आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना काल मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी दोन लाख रूपयांच्या जात मुचलक्यावर पालांडे यांना जामीन मंजूर केला. मात्र, अनिल देशमुखांप्रमाणेच सीबीआयच्या केसमध्येही अटक असल्यानं तूर्तास कारागृहातून पालांडे यांची सुटका होणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.