आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने उत्तर द्यावे:राजकीय विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग होतोय का, राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकीय विरोधकांचा आवाज दडपणम्यासाठी केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग होतोय का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. याचे उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल जामीन मिळाला. त्यांना जामीन देताना न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. त्यात राऊत यांची अटक बेकायदा असल्याचे म्हटले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

संबंध नसताना गोवले

तपासे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी स्वतःच्या राजकीय विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करतेय की काय, अशी शंका जनतेच्या मनामध्ये आहे. काल संजय राऊत यांना बेल मिळाला. या निकालात कोर्टाने काही गोष्टी नमूद केल्या आहेत. त्यामध्ये कोर्टाने असे स्पष्ट मत व्यक्त केले की, संजय राऊतांचा काहीही थेट संबंध नसताना त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले.

सुनावणी कासव गतीने

तपासे म्हणाले की, कोर्टाचे दुसरे निरीक्षण असे होते की एकेक करून टार्गेट करण्याचा प्रयत्न या प्रकरणामध्ये झालेला आहे. तिसरे निरीक्षण कोर्टाने नोंदवले ते असे आहे की, ईडी कारवाई करताना झपाट्याने अटकेची कारवाई करते. परंतु या प्रकरणाची सुनावणी कासवाच्या गतीने होते.

भय निर्मितीचा प्रयत्न

तपासे म्हणाले की, चौथे आणि सर्वात महत्त्वाचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले ते असे आहे, या प्रकरणामध्ये माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देखील टाकण्यात आले. हे नाव पवार साहेबांच्या मनामध्ये किंवा काँग्रेसच्या नेत्यांच्या मनामध्ये भय निर्माण करण्यासाठी हे नाव टाकण्यात आले का, असा सवाल देखील कोर्टाने विचारलेला आहे. केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दडपण्यासाठी ते करतायत का, याचे उत्तर भारतीय जनता पार्टीने दिले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...