आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीचे अध्यक्ष रुग्णालयात दाखल:पोटदुखीच्या तक्रारीनंतर शरद पवारांना मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये केले दाखल, नवाब मलिक म्हणाले - 'साहेबांना पित्ताशयाची समस्या'

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवार 31 मार्चपर्यंत रुग्णालयात दाखल राहणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या तक्रारीनंतर मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 80 वर्षांच्या पवारांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांनी केली आहे. मलिक म्हणाले की - 'रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याची माहिती मिळाली आहे. एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम सलग त्यांची तपासणी करत आहेत. शरद पवार साहेब लवकरच बरे होऊन घरी येतील अशी आशा आहे.'

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले की शरद पवार हे रक्त पातळ करणार्‍या औषधांवर होते, परंतु आता हे औषध थांबवले जात आहे. ब्रीच कँडीमध्ये तपासणी झाल्यानंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिवाय 31 मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल. पुढील सूचना होईपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

सुप्रिया सुळेंनीही दिली पवारांच्या प्रकृतीविषयी माहिती
खासदार सुप्रिया सुळे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवारांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, बाबांना पित्ताशयाचा त्रास होत असल्याने त्याकडे तातडीने लक्ष देऊन उपचार करणे गरजेचे आहे. म्हणूनच त्यांना बुधवार 31 मार्चला10 दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येईल. त्यानंतर ते घरीच विश्रांती घेतील. त्यामुळे त्यांचे आजपासून सुरु होणारे नियोजित कार्यक्रम आणि दौरे पुढील 2 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात येणार आहेत.

डॉक्टर म्हणाले होते- कर्करोगामुळे केवळ 6 महिनेच राहिले आहे पवारांचे आयुष्य
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख त्यांच्या लढाऊ स्वभावासाठी ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी तोंडाच्या कर्करोगाने ग्रासलेल्या पवारांना डॉक्टरांनी सांगितले होते की त्यांची फक्त 6 महिने शिल्लक आहेत. मात्र, आपल्या दृढ इच्छेच्या बळावर त्यांनी कर्करोगाविरूद्ध दीर्घ लढाई लढवली आणि ती जिंकली. पवार स्वत: असे म्हणतात की मी कर्करोगाविरूद्धचे युद्ध जिंकू शकलो कारण या रोगाशी लढण्याची माझी इच्छाशक्ती खूपच मजबूत होती. मी जर लढाई सोडली असती किंवा काम करणे सोडले असते तर कर्करोग जिंकला असता.

बातम्या आणखी आहेत...