आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. सामना या वृत्तपत्रात आणि डिजीटल प्लॅटफॉर्मवरही मुलाखत लवकरच प्रसारित होणार आहे. मात्र त्यापूर्वी संजय राऊत यांनी या महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेत असणारा प्रश्न शरद पवारांना विचारला आहे. राऊतांनी नुकताच मुलाखतीचा दुसरा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये संजय राऊतांचे अनेक प्रश्न आणि शरद पवारांची दिलखुलास उत्तरे पाहायला मिळत आहेत.
संजय राऊत यांनी शेअर केलेल्या दुसऱ्या प्रोमोमध्ये शरद पवार हे भाजप आणि शिवसेनेच्या संबंधांविषयी भाष्य करत असल्याचं दिसत आहे. यामध्ये बोलताना पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजपल्या मिळालेल्या 105 जागांमध्ये शिवसेनेचं मोठं योगदान आहे. तसेच भाजप आणि शिवसेनेची विचारधार कधी भाजपच्या विचाराशी सुसंगत होती असे मला कधीच वाटले नाही असंही त्यांनी बोलून दाखवलं आहे. यासोबतच संजय राऊत यांनी शरद पवारांना राज्याच्या राजकीय वर्तुळात सर्वात जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्नही विचारला आहे. 'ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर?' असा थेट प्रश्न राऊतांनी शरद पवारांना विचारला. त्यावरील उत्तर मुलाखतीचा संपूर्ण भाग प्रसारित झाल्यानंतरच पाहायला मिळेल.
ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर?
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 9, 2020
काय म्हणतात शरद पवार? pic.twitter.com/ot0Y8pdJ0X
दरम्यान संजय राऊतांनी बुधवारीही मुलाखतीचा एक टिझर शेअर केला होता. यामध्ये एक शरद, सगळे गारद…!अश्या मथळ्याखाली संजय राऊतांनी ट्विटवर मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध केला होता. ही मुलाखत तीन भागांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. यासोबतच या मुलाखतीचा पहिला भाग 11 जुलै रोजी शिवसेनेच्या मुखपत्रातून आणि डिजिटल माध्यमाद्वारे प्रसिद्ध केला जाणार आहे. यासोबतच त्यानंतर 12 आणि 13 जुलै रोजी या मुलाखतीचा दुसरा आणि तिसरा भागही पाहायला मिळणार आहे.
पहिल्या टीझरमध्ये संजय राऊत अनेक मुद्द्यांना हात घालताना दिसले होते. कोरोनापासून तर सरकार स्थापनेपर्यंत, तसंच राममंदिराशी संबंधित प्रश्नांना शरद पवार हे उत्तर देत असल्याचं या टिझरमध्ये पाहायला मिळालं होतं. राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. या सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचंही बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ही मुलाखत महत्त्वाची मानली जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.