आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:शरद पवारांनी घेतली संजय राऊतांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस; राऊतांवर नुकतीच झाली आहे अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5 डिसेंबरला राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज शिवसेना नेते संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. संजय राऊत आणि शरद पवारांच्या या भेटीमुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे .संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवारांनी ही भेट घेतल्याची माहिती आहे. नुकतीच संजय राऊतांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. यानंतर 5 डिसेंबरला राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शरद पवारांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. यानंतर शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीसाठी रवाना झाले. यावेळी शरद पवारांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे यांसह दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. संजय राऊतांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली यानंतर राष्ट्रवादीच्या दिग्ग्ज नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी अनेक राजकीय विषयांवरही चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser