आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांचे राज्यपालांना खरमरीत पत्र:तुम्ही मुख्यमंत्र्यांना निधर्म वादासंदर्भात दिलेल्या सल्ल्याची आणि गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद कुठे? शरद पवारांचा खोचक टोला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेले 'जनराज्यपाल – भगतसिंह कोश्यारी' हे चित्ररुप कॉफी टेबल पुस्तक शरद पवार यांना पाठवण्यात आले होते.

राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये नेहमीच कुरबुरी सुरू असतात. यामध्ये आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतली आहे. राज्यपालांनी शरद पवार यांना कॉफी टेबल पुस्तक पाठवले होते. त्याला अभिप्राय देत शरद पवारांनी एक खरमरीत पत्रच राज्यपालांना पाठवले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेले 'जनराज्यपाल – भगतसिंह कोश्यारी' हे चित्ररुप कॉफी टेबल पुस्तक शरद पवार यांना पाठवण्यात आले होते. त्या पुस्तकावरुन शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांना खरमरीत शब्दात एक पत्र लिहिले. यामध्ये शरद पवारांनी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख करत लिहिलेल्या पत्राविषयी टोलाही लगावला आहे.

शरद पवारांनी या पत्रामध्ये लिहिले की, 'भारतीय संविधानात जनराज्यपाल असा उल्लेख आढळत नाही, तरीही राज्य शासनाच्या वतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल मनापासून धन्यवाद. पुस्तकाचे अवलोकन केले असता एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ दीक्षांत समारंभ सोहळे, उच्चपददस्थ गाठीभेटी सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र आहेत'

पत्रात पुढे लिहिले आहे की, 'तसेच निधर्म वादासंदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही' असा खोचक सवाल शरद पवारांनी विचारला आहे. तसेच असो आपण आठवणीने आपल्या ऐतिहासीक कारकिर्दीचा लेखाजोखा पाठवला याबद्दल मी आपला पुनश्च आभारी आहे' असे पवार म्हणाले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत हिंदुत्वावावरुन डिवचले होते. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उत्तर दिले होते. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे म्हणत त्यांनी खोचक शब्दांमध्ये त्यांना प्रत्युत्तर दिले होते. यानंतर महाविकास आघाडी आणि राज्यपाल असा मोठा वाद निर्माण झाला होता.