आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोनवर संवाद:राज्यपालांच्या सल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी चर्चा, यावर पवार म्हणाले...

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर राजपाल भगतसिंह कोश्यारींची गुरुवारी भेट घेतली.

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. शरद पवार यांनीही या चर्चेविषयी प्रतिक्रिया दिली आहे. राज यांच्याशी फोनवर चर्चा झाली असून भेटीबद्दल मात्र काहीही ठरले नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर राजपाल भगतसिंह कोश्यारींची गुरुवारी भेट घेतली. या भेटीमध्ये पवार साहेबांशी बोलून घ्या असा सल्ला राज्यपालांनी राज यांना दिला होता. यानंतर राज ठाकरेंनी पवारांशी फोनवर चर्चा केली आहे. राज ठाकरेंचा फोन आल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. मात्र भेटीबाबत काही ठरलेले नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.

राज ठाकरेंनी गुरुवारी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीमध्ये ठाकरेंनी लॉकडाऊन आणि अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दूध दराचा मुद्दा उचलून धरला होता. वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेले दुर्लक्ष यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती मनसे पक्षातर्फे करण्यात आली होती.