आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत, असातच राष्ट्रवादीला जबरदस्त खिंडार पडली आहे. राष्ट्रवादीच्या गोंदियातील नगराध्यक्षासह 15 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांच्या अंगावर भगवा रंगाची शाल टाकत त्यांना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची गोंदियातील ताकद वाढली आहे. तर राष्ट्रवादीला गोंदियात मोठा फटका बसला आहे.
ठाणे येथील निवासस्थानी केले स्वागत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे गोंदियातील दोन नगराध्यक्ष, 15 नगरसेवक आणि राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी महिला कार्यकर्त्याही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दीघे यांच्या नावाने जयघोष केला. या पक्षप्रवेशामुळे गोंदियात राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडली आहे.
नगराध्यक्ष चंद्रिकापुरे म्हणाले- विकासासाठी साथ
नगराध्यक्ष डॉ. चंद्रिकापुरे हे सडक अर्जुनी तालुक्यात राहतात. माझ्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. सडक अर्जुनी नगर पंचायत आणि अर्जुनी नगरपंचायतमधील 15 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे. दोन बांधकाम सभापती आणि बाकी वॉर्ड सदस्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी आम्ही शिंदे गटात प्रवेश केला आहे. विदर्भ हे मागास क्षेत्र आहे. आम्हाच्या भागात निधी डावलला जातो. त्यामुळे या भागाचा विकास व्हावा म्हणून आम्ही शिंदे गटात आलोय, असं या चंद्रिकापुरे यांनी सांगितलं.
शिंदे म्हणाले होते- अनेक नेते संपर्कात
दरम्यान, आमच्या संपर्कात अनेक नेते आणि कार्यकर्ते असल्याचा दावा यापूर्वीच शिंदे गटाने केला आहे. यात ठाकरे गटाचे नेते, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारीही असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे हे पक्षप्रवेश वाढतील असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसणार असल्याचं चित्रं आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.