आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिकांवरील कारवाईवर प्रतिक्रिया:नवाब मलिकांवर निव्वळ राग काढण्याचे काम सुरू; पूर्वसूचना न देता घेऊन जाणे ही lj नियमांची पायमल्ली -जयंत पाटील

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक हे ईडी कार्यालयात पोहोचल्याची माहिती आहे. तेव्हापासून त्यांची चौकशी केली जात आहे आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे. आता यावर राष्टवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याविषयावर प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिकांवर राग काढण्याचे काम सुरु आहे असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर लावला आहे. ते म्हणाले की, 'हा सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणखी प्रकार आहे, कोणतीही, सूचना व देता पहाटे सहा वाजता येऊन ईडी स्वतःच पोलिस आणतेय आणि राज्यातील मंत्र्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता घेऊन जाणं ही नियमांची पायमल्ली आहे.' असा आरोप देखील जयंत पाटलांनी लावला आहे.

जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचे काम
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'नवाब मलिक यांनी नुकतीच काही प्रकरणे बाहेर काढली होती, त्याची प्रतिक्रिया म्हणून त्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचे काम काही लोकांकडून केले जात आहेत. हे नेमके कोणते प्रकरण आहे याबद्दल माहिती नाही, गेल्या काही वर्षामध्ये असे प्रकरणही दिसत नाही. नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम कदाचित चालू झालेलं दिसत आहे.'

मलिकांची ईडीकडून चौकशी
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी अचानकपणे नेले असल्याची माहिती आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...