आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • NCP Jayant Patil On Chief Justice Uday Lalit And Eknath Shinde | Sitting With The Chief Justice While The Government Is Hearing The Legitimacy Is Not Appropriate

सरन्यायाधीश- CM शिंदे एकाच मंचावर:राष्ट्रवादीची टीका- सरकार वैधतेची सुनावणी सुरू असताना असे करणे संकेतांना धरून नाही

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे हे संकेतांना धरून नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरू आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे याबाबतचा आक्षेप जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.

सरन्यायाधीश उदय लळीत यांचा सत्कार समारंभ नुकतच पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपले मत मांडले. ते म्हणाले की, “सरन्यायाधीश यांना व्यासपीठावर बसवणे चुकीचे आहे. मी त्याबाबत माझे मत मांडले. घटनापीठाकडे खटला सुरू असताना सरन्यायाधीशांना कार्यक्रमात नेणे हे चुकीचे आहे." अशी प्रतिक्रिया पाटलांनी दिली. याबाबत राज्यपालांना भेटणार का असा प्रश्न विचारला असता याबाबत टाइमपास करायला आमच्याकडे वेळ नाही, अशी खोचक प्रतिक्रियाही जयंत पाटलांनी यावेळी दिली.

27 सप्टेंबरला सुनावणी

दरम्यान, राज्यात मविआ सरकार कोसळले असून, शिवसेना कुणाची हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडे देण्यात आले आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात होणार आहे. गेल्या सुनावणीत पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. त्यात शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी कोर्टात युक्तीवाद केला. निवडणूक आयोगाच्या सुनावणीवरील स्थगिती उठवण्यात यावी, यासह शिवसेनेने धनुष्यबाण गोठवावे आणि घटनापीठाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी कौल यांनी केली आहे.

सेना कुणाची?

शिवसेना कुणाची? याबाबत निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी 23 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. पण त्याआधीच सुनावणी सुरू व्हावी, असी विनंती शिंदे गटाने केली आहे. जवळपास आठ ते दहा दिवसांपासून सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबद्दल हालचाली झालेली नाही. याआधीचे सरन्यायाधीश एन.बी. रमना निवृत्त झाले आणि त्यानंतर ही सुनावणी कधी होणार या बाबत अनिश्चितता आहे.

शिवसेनेला 4 आठवड्यांचा वेळ

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची विनंती मान्य करत 4 आठवड्यांची वेळ वाढवून देण्यात आली आहे. शिवसेनेने 23 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ मागितली होती. निवडणूक आयोगाने सेनेची ही विनंती मान्य केली आहे. शिवसेनेने यापूर्वी देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 4 आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती

बातम्या आणखी आहेत...