आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीकडून निषेध:ना ऑक्सिजन, ना रेमडेसिवीर; अपयश झाकण्यासाठी, माध्यमांचे लक्ष विचलित करण्यासाठी CBI ची खेळी जुनीच

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो

100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने शनिवारी छापे टाकले. यानंतर अनिल देशमुखांविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. याचा राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी यावर टीका करत म्हटले की, राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देशमुखांवर धाडसत्र सुरू आहे. तर केंद्र सरकारचे अपयश लपविण्यासाठी आणि माध्यमांचे लक्ष विचलित करण्यासाठी केंद्र सरकारची ही जुनीच खेळी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावरून म्हटले आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

सोशल मीडियाच्या माध्यमातून जयंत पाटलांनी या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. ते म्हणाले की, 'या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो.'

पुढे जयंत पाटील म्हणाले की, 'या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्याप पर्यंत ऐकिवात नाही. परंतु ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.'

तसेच 'महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला व सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण 4 जणांची चौकशी झाली, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. मा.उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’चे आदेश दिलेले होते.' असे म्हणत जयंत पाटलांनी विरोधकांवर टीका केली आहे. त्यांनी नाव घेतले नसले तरीही त्यांचा रोख हा भाजपकडे होता.

सीबीआयने देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी वसुलीच्या आरोपांवरून एफआयआर दाखल केला आहे. यासोबतच देशमुख यांच्या मुंबईतील सरकारी बंगल्यासह अनेक ठिकाणी छापेमारी केली. यापूर्वी सीबीआयने देशमुख यांची 11 तास चौकशी केली होती. त्यासोबतच संबंधित प्रकरणात देशमुख यांचे दोन स्वीय्य सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांचीदेखील 10 तास चौकशी करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...