आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जितेंद्र आव्हाड संतापले:महेश मांजरेकर कोण आहेत? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान काय? 'गोडसे' चित्रपटाच्या घोषणेनंतर आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीच्या मुहूर्तावर अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी 'गोडसे' या चित्रपटाची घोषणा केली होती.

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेवर ते चित्रपट करत असल्याची माहिती द्यांनी दिली. महात्मा गांधींच्या 152 व्या जयंतीच्या मुहूर्तावर महेश मांजरेकरांनी चित्रपटाचा टीजर शेअर केला. मात्र मांजरेकरांच्या या घोषणेनंतर विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे.

मांजरेकरांच्या चित्रपटावर आव्हाडांनी आक्षेप नोंदवला. त्यांनी ट्वीट करत महेश मांजरेकर कोण आहेत? भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचे योगदान काय? असा सवाल केला आहे. यासोबतच लोकांचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेलं हे नाटक असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

काय म्हणाले होते मांजरेकर?
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीच्या मुहूर्तावर अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी 'गोडसे' या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. तसेच 'वाढदिवसाच्या सर्वात घातक शुभेच्छा! यापूर्वी कोणीही सांगण्याचे धाडस केले नाही अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा!' संदीप सिंग, राज शांडिल्य आणि महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींच्या 152 व्या जयंतीनिमित्त 'गोडसे' सिनेमाची घोषणा केली.

यावेळी मांजरेकर म्हणाले की, नथुराम गोडसेची कथा नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळची आहे. अशा स्वरुपाच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी खूप धैर्य लागते. कठीण विषयांवर आणि बिनधास्त गोष्टींवर माझा नेहमीच विश्वास आहे. सिनेमाचे हे कथानक अशाच पद्धतीचे आहे. महात्मा गांधींवर गोळीबार करणारी व्यक्ती, या ओळखीशिवाय त्यांच्याबद्दल कुणालाही जास्त माहिती नाही. त्यांची कथा सिनेमामधून सांगत असताना, कुणालाही पाठिशी घातलेले नाही ना कुणाच्या विरोधात भाष्य केले आहे. योग्य काय अयोग्य काय आहे ते प्रेक्षकांवर आम्ही सोडले असल्याचे मांजरेकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...