आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. सकाळी 6 च्या दरम्यान नवाब मलिक हे ईडी कार्यालयात पोहोचल्याची माहिती आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईमागचे कारण काय, कुणी आणि काय आरोप केले होते? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
फडणवसांनी केले होते खळबळजनक आरोप
माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी नोव्हेंबर 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांवर गंभीर आरोप लावले होते. ते म्हणाले होते की, मलिकांच्या कंपनीने अशा लोकांकडून जमीन खरेदी केली आहे. जे 1993 च्या मुंबई ब्लास्टमध्ये आरोपी आहेत. ही जमीन दाऊद इब्राहिमशी संबंधीत आहे. तसेच नवाब मलिकचे अंडरवर्ल्डशी संबंध असून दिवाळीनंतर बॉम्बस्फोट करणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. त्याच्या थोड्याच वेळानंतर नवाब मलिकांनीही पत्रकार परिषद बोलावली. ज्यामध्ये त्यांनी फडणवीसांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले होते.
दुसरीकडे पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ते जे सांगत आहेत ते सलीम जावेदची गोष्ट किंवा इंटरव्हलनंतरची फिल्म नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. या आरोपांवर नवाब मलिक यांनी म्हटले होते की, फडणवीसांनी 'राई का पहाड' करून हे प्रकरण मांडले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की दिवाळीनंतर बॉम्ब फोडेन, बॉम्ब फुटला नाही, पण आता उद्या रात्री दहा वाजता अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब फोडेन.
फडणवीस यांनी अंडरवर्ल्डच्या दोन चेहऱ्यांचा केला होता खुलासा
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दोन नावे दिली होती. त्यात सरदार शाह वली खान आणि मोहम्मद सलीम पटेल यांचा उल्लेख होता. फडणवीस म्हणाले होते की, सरदार शाह वली खान हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहेत, ज्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो टायगर मेमनचा साथीदार होता, तसेच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मुंबई महापालिकेत बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी त्यांने केली होती. त्यानेच टायगर मेमनच्या वाहनात आरडीएक्स लोड केले होते.
दुसरी व्यक्ती मोहम्मद सलीम पटेल आहे, जो दाऊद इब्राहिमचा माणूस होता. फडणवीस यांनी तो हसीना पारकरचा ड्रायव्हर, बॉडीगार्ड असल्याचे सांगितले होते.
दाऊद फरार झाल्यानंतर हसीनाच्या नावावर जमा होत होती संपत्ती
फडणवीस म्हणाले होते की, '2007 मध्ये हसिना पारकरला अटक झाली तेव्हा सलीम पटेला देखील अटक करण्यात आली होती. दाऊद फरार झाल्यानंतर हसीनाच्या नावावर संपत्ती जमा झाल्याचे रेकॉर्डवरून समोर आले आहे. यात सलीमची महत्त्वाची भूमिका होती. संपत्तीची पावर अटॉर्नी त्याच्या नावावर घेतली जात होती. हा सलीम पटेल हसिनाच्या सर्व बिझनेसचा प्रमुख होता.'
मलिक यांच्या कंपनीला कौडीमोल भावात विकली जमीन
फडणवीसांनी आरोप केला होता की, सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांचे निकटवर्तीय सलीम पटेलचे नवाब मलिक यांच्याशी व्यावसायिक संबंध आहेत. या दोघांनी मुंबईतील LBS रोडवरील कोटय़वधींची जमीन नवाब मलिक यांच्या नातेवाईकाच्या एका कंपनीला कौडीमोल भावात विकली. याची विक्री सरदार शाह वली खान आणि सलीम पटेल यांनी केली होती. नवाब मलिकही काही काळ या कंपनीशी संबंधित होते. कुर्ल्यातील LBS रोडवरील 3 एकर जमीन केवळ 20-30 लाखांना विकली गेली, तर त्याचा बाजारभाव 3.50 कोटींहून अधिक होता.
मलिक यांना सवाल - मुंबईतील गुन्हेगारांकडून जमीन का खरेदी केली?
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मुंबईतील गुन्हेगारांकडून जमिनी का खरेदी केल्या? अशा एकूण 5 मालमत्ता आहेत, त्यापैकी 4 मालमत्तांमध्ये तर 100 टक्के अंडरवर्ल्डची भूमिका होती. हे सर्व पुरावे राष्ट्रवादीचे शरद पवार आणि सक्षम डिपार्टमेंटला दिले जातील. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरदार शाह वली याला 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो सध्या तुरुंगात आहे. त्याला मुंबई बॉम्बस्फोटांची माहिती होती. वाहनांमध्ये स्फोटकं भरणाऱ्या लोकांमध्ये तो होता.
मालमत्ता जप्तीपासून वाचवण्यासाठी मलिकांनी मालमत्ता खरेदी केली होती का?
फडणवीस यांनी सवाल केला की, नवाब मलिकांनी सांगावे की, जेव्हा सौद्याच्या वेळी (2005)मध्ये ते मंत्री असताना हा करार कसा झाला? मुंबईतील गुन्हेगारांकडून जमीन का खरेदी केली? त्यावेळी या दोषींवर TADA लावण्यात आला होता. कायद्यानुसार TADA दोषीची मालमत्ता सरकार जप्त करते. TADA आरोपींची जमीन जप्त झाली नाही म्हणून ती तुमच्याकडे हस्तांतरित करण्यात आली का? असा सवाल देखील फडणवीसांनी विचारला.
प्रफुल्ल पटेल यांनीही अंडरवर्ल्ड मालमत्ता खरेदी केली : आमदार भातखळकर
ड्रग्ज प्रकरणात आणखी एक खुलासा करताना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले होते की, प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्री असताना त्यांनी इकबाल मिर्चीची पत्नी जी सरकारी रेकॉर्डमध्ये वाँटेड होती. तिची मालमत्ता विकत घेतली होती. राष्ट्रवादीमध्ये अंडरवर्ल्ड लोकांच्या मालमत्ता खरेदी करण्याचा हा प्रकार जुना असल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला होता.
ज्या जमिनीविषयी बोलत आहात तिथे माझे कुटुंब भाडेकरु होते : मलिक
देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर नवाब मलिक म्हणाले होके की, ज्या जमिनीचा उल्लेख केला जात आहे त्या जागेत त्यांचे कुटुंब आधीच भाडेकरू होते. नंतर त्याची मालकी घेतली गेली. नवाब मलिक म्हणाले, 'ज्या जमिनीचा उल्लेख करण्यात आला त्या जागेवर कॉपरेटिव्ह सोसायटी आहे. जी 1984 मध्ये बनली होती. ते गोवा कंपाऊंड म्हणून ओळखले जाते. तिथे आमचे गोदामही आहे. जे तीस वर्षांसाठी भाडेतत्त्वावर होते.'
आम्ही कोणत्याही अंडरवर्ल्ड गुन्हेगाराकडून जमीन खरेदी केलेली नाही : मलिक
नवाब मलिक म्हणाले की, जमिनीच्या मालकाने आमच्याशी संपर्क साधला होता की, ते आम्हाला भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीची मालकी देऊ इच्छित आहे. त्यानंतर ज्यांच्या नावावर पॉवर ऑफ अॅटर्नी होती, म्हणजेच सलीम पटेल, त्याच्याकडून जमीन घेण्यात आली.
ज्या जमिनीबद्दल बोलले होते ती कॉर्पोरेटिव्ह सोसायटी आहे
नवाब मलिक म्हणाले की, आमच्यावर 1.5 लाख फुट जमीन कौडीमोल भावात माफियांकडून खरेदी केल्याचा आरोप आहे. पण प्रत्यक्षात तिथे एक कॉपरेटिव्ह सोसायटी आहे. जी 1984 मध्ये स्थापन झाली होती. यालात गोवावाला कंपाऊंड म्हणतात. मुनिरा पटेल यांच्याकडून विकास हक्क घेऊन रस्सीवाला यांनी त्यावर घरे बांधून विकली होती. त्याच्या मागे आमचे गोदाम आहेत. ते मुनिरा यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेतले होते. तिथे आमची चार दुकानं देखील होती.
मुनिरा पटेल यांनी सलीम पटेल यांना पॉवर ऑफ अॅटर्नीचे अधिकार दिले होते, आम्ही त्यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या गोदामाची मालकी घेतली. त्यावेळी जी किंमत होती, तिच देण्यात आली. आम्ही मालकिणीकडून जमीन घेतली, मालकिन म्हणाली की सलीम पटेल हे माझे पॉवर ऑफ अॅटर्नी आहे, यांच्यासोबत सर्व व्यवहार करा.
आशिष शेलार म्हणाले होते - मलिक यांनी फडणवीसांचे आरोप मान्य केले
मलिक यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन त्यांच्यावर पलटवार केला होता. मलिक यांनी फडणवीस यांनी केलेले आरोप मान्य केल्याचा दावा शेलार यांनी केला होता. आशिष शेलार यांनी मागणी केली होती की, मुख्यमंत्र्यांनी आता या संबंधात FIR करुन तपास केला पाहिजे. शेलार यांनी सवाल केला होता की, संपूर्ण भवन कमी किंमतीत भाड्याने कसे दिले जाऊ शकते? नवाब मलिक सामान्य जनतेला मूर्ख समजतात का? असा खोचक सवालही त्यांनी केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.