आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे काहीतरी गुपित लपवण्यासाठीच 'राजसभा':राज ठाकरेंच्या सभा भाजप पुरस्कृत, धनंजय मुंडे यांची टीका

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा भाजप पुरस्कृत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे काहीतरी गुपित लपवण्यासाठीच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात या सभा घेत असल्याचे देखील धनंजय मुंडे म्हणाले. राज ठाकरे यांची सभा औरंगाबाद येथे होत आहे, या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी भाजप तथा मनसेवर टीका केली.

मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित पोलखोल सभेवर देखील धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. भाजपने देवाच्या नावाने पैसे गोळा केले असा आरोप देखील त्यांनी लावला. भारतीय जनता पक्षाचे फेल्युअर लपवण्यासाठीच भाजप अशा सभा घेत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांच्या सभेवर टीका

औरंगाबाद मध्ये होणारी राज ठाकरे यांच्या सभा वादळी ठरणार असल्याचे चित्र आहेत. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या वतीने राज ठाकरे यांच्या सभेच्या वर टीका होत आहे. राज ठाकरे महाविकास आघाडीच्या विरोधात कोणती तोफ डागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...