आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळजनक आरोपांवर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया:आकसापोटी असे आरोप केले जाऊ शकतात, चौकशीमध्ये तथ्य समोर येतील; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलिस अधिकारी परमबीर सिंहांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी खळबळजनक आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझेंना दिले असल्याचा दावाच त्यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. दरम्यान आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी याविषयी प्रतिक्रिया देत विरोधीपक्षावरच आरोप केले आहे. 'आकसापोटी असे आरोप केले जाऊ शकतात. जे काय याविषयीचे सत्य असेल तर चौकशीमध्ये समोर येईल. तसेच या प्रकरणामध्ये जे काही असेल त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देखमुख हे स्पष्ट करतील' असेही एकनाथ खडसेंनी म्हटले आहे.

100 कोटींच्या आरोपांचा लेटर बॉम्ब:परमबीर सिंहांचा आरोप - 'अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी जमा करण्याचे दिले टार्गेट'; गृहमंत्र्यांनी फेटाळून लावले आरोप

परमबीर सिंहांनी आरोपांमध्ये काय म्हटले?

या पत्रामध्ये परमबीर सिंहांनी लिहिले आहे की, 'महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना अनेकदा आपला शासकिय बंगला ज्ञानेश्वरमध्ये बोलावले आणि फंड कलेक्ट करण्याचे आदेश दिले. त्यांनी हे पैसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावावर जमा करण्यास सांगितले. या दरम्यान त्यांचे पर्सनल सेक्रेटरी मिस्टर पलांडे देखील उपस्थित राहायचे. गृहमंत्री अनिल देखमुखांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते.'

बातम्या आणखी आहेत...