आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थ अपडेट:राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची अँजिओग्राफी झाली, कोणताही दोष आढळलेला नसल्याची स्वतः पाटलांनी दिली माहिती

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लवकरच जयंत पाटील कामावर रुजू होणार आहेत.

बुधवारी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना प्रकृती बिघडल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अचानक अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांनी आपली प्रकृती उत्तम असल्याची माहिती दिली होती. आज त्यांच्या आरोग्याविषयी नवीन अपडेट येत आहेत. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आल्याची माहिती आहे.

जयंत पाटील यांची आता अँजिओग्राफी झाली असल्याची माहिती आहे. या चाचणीमध्ये कोणताही दोष आढळलेला नाही. यामुळे ऑपरेशन करण्याची आवश्यकता नसल्याचेही समजत आहे. लवकरच जयंत पाटील कामावर रुजू होणार आहेत. स्वतः जयंत पाटील यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली. आहे.

जयंत पाटील ट्विट करत म्हणाले की...
जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटले की, 'आज ब्रीच कँडी रुग्णालयात माझी अँजिओग्राफी चाचणी झाली असून त्यात कोणताही दोष आढळलेला नसल्याने काळजीचे कारण नाही. दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानंतर लगेचच जनसेवेत रुजू होण्याचा माझा मानस आहे. आपण व्यक्त केलेल्या संवेदनांप्रती मी आपला आभारी आहे.'

बातम्या आणखी आहेत...