आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्लाबोल:'चिंगारी आग में बदल जाएगी' करमुसे प्रकरणाचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला इशारा

ठाणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमुसे प्रकरणाचा उल्लेख करत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 'चिंगारी आग में बदल जाएगी' असे म्हणत राज्य सरकारला इशारा दिला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 30 वर्षे एका शहरातसोबत काम करुणही मुलीला धमकी आल्यानंतर साधा फोनही केल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

ठाकरे गटाच्या नेत्या रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरुन महाविकास आघाडीकडून ठाण्यात आज भव्य जनप्रक्षोभ मोर्चा काढला होता. ठाणे पोलिस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर या मोर्चाची सांगता झाली. यावेळी भाषणादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी करमुसे प्रकरणापासून तर महेश आहेर यांच्या वक्तव्या प्रकरणावरुन शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महेश आहेरांवर टीकास्त्र

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महेश आहेर यांचे रोजचे उत्पन्न 40 लाख तर महिन्याचे 12 कोटी असताना त्यांच्यावर कारवाई का नाही. जितेंद्र आव्हाड यांना गुन्हेगार ठरविण्यासाठी लोकांना 12 ते 14 तास रोज त्रास दिला जातोय, असा आरोप वैभव कदम यांच्या आत्महत्येवरुन आव्हाड यांनी केला आहे. भरसभेत करमुसे प्रकरणाचा उल्लेख करत फोटो दाखवत 'चिंगारी आग में बदल जाएगी'चा आव्हाडांचा इशारा दिला आहे.

महिलेला मारहाण करणं हेच संस्कार?

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, रोशनी शिंदे यांच्या सर्व पोस्ट मी वाचल्या, तिच्या पोस्ट शिवसेनेच्या संस्करातील होत्या, तिने आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही. गर्भशयाचे ऑपरेशन सुरू आसताना तिला मारले गेले हेच तुमचे संस्कार आहे का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. 67 देशांनी तुमच्या या संस्कारांची नोंद घेतली, एखाद्या महिलेला तुम्ही आई होऊ नये म्हणून मारता हेच का तुमचे संस्कार का असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. सुभाषसिंग ठाकूर तोच आहे ज्याने जेजे च्या हत्याकांडात 4 पोलिसांना मारले.

शिंदेंचा साधा फोन नाही

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माझ्या मुलीला सारख्या धमक्या येत होत्या मी आणि एकनाथ शिंदे यांनी 30 वर्षे सोबत एकाच शहरात राजकारण केले आहे, आमचे वैचारिक मतभेद असतील मात्र त्यांनी एकही कॉल केला नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.