आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असताना दिसत आहे. देशभरात सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रातून समोर येत आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती ही अत्यंत विदारक झाली आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र यासोबतच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील कोरोना पॉझिटिव्ह असून उपचार घेत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे.
राज्यातील परिस्थिती बिकट आहे यासोबतच मुख्यमंत्र्याच्या घरातील दोन सदस्य हे कोरोनाशी लढात देत असताना मुख्यमंत्री आपली जबाबदारी उत्तरप्रमारे सांभाळत आहे. ते सतत आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत. दरम्यान कोरोना परिस्थिती योग्यरित्या हाताळू शकत नाहीत असे म्हणत त्यांच्यावर विरोधकांकडून बरेचदा टीकाही केले जातेय. या सर्वांवरुन जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर भाष्य केले आहे. आव्हाडांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सलाम ठोकला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय.टिका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत..त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.