आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचा पंतप्रधान मोदींना चिमटा:'...असेच सुरू राहिले तर मोदी नोटांवरुनही गांधींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो लावतील'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटेवरुन नवीन वाद सुरू झाला आहे.

पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळेल. दरम्यान संपूर्ण देशभरामध्ये लसीकरण सुरू आहे. मात्र लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे. यामुळे एक नवीन वाद सुरू झाला आहे. तृणमूलने लसीकरण प्रमाणावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेप घेतला आहे. दरम्यान आता राष्ट्रवादीनेही या मुद्द्यावरुन केंद्राला खोचक टोला लगावला आहे.

'पंतप्रधान मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत एवढे पुढे निघून गेले आहेत की, सर्व पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो, रेल्वे स्थानकांवर मोदींचा फोटो, एअरपोर्टवरह मोदींचा फोटो, जिथे पाहावे तिथे मोदींचाच फोटो दिसत आहे. आता खादीच्या कॅलेंडरवरुनही गांधांचा फोटो हटवून त्यांनी स्वतःचा फोटो छापला आहे. आता लसीकरण केले जात आहे आता त्याच्या प्रमाणपत्रांवरही मोदींचाच फोटो लावला जात आहे. जर असेच सुरू राहिले तर मला वाटते की, नोटांवरही गांधींचा फोटो हटवून मोदी स्वतःचा फोटो लावतील.'

बंगालमध्ये निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. दरम्यान लसीकरण मोहिमही जोरात सुरू आहे. आता लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटेवरुन नवीन वाद सुरू झाला आहे. या छायाचित्राचा विरोध केला जात आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...