आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिक आता बिनखात्याचे ‘नवाब’:राजेश टोपे, धनंजय मुंडे यांच्यावर मलिक यांच्या खात्यांची अतिरिक्त जबाबदारी, राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीत निर्णय

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक अटकेत आहेत. मात्र, मलिक यांचा राजीनामा न घेता त्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून ठेवण्यात यावे. त्यांच्याकडील मंत्री विभाग, पक्षाचे मुंबई अध्यक्षपद तसेच परभणी व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आदींचा कारभार इतर मंत्र्यांकडे सोपवण्यात यावा, असा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत झाला.

गुरुवारी सकाळपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरू होते. यात प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे आदी ज्येष्ठ नेत्यांची बैठकीत उपस्थिती होती. मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा न घेण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला. नवाब मलिक यांच्याकडे मुंबई पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी होती. पालिका निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार आता राखी जाधव यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. राखी जाधव या मुंबई महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या गटनेत्या आहेत.

यांच्याकडे मलिक यांच्या खात्याचा अतिरिक्त कारभार

  • परभणी पालकमंत्री : धनंजय मुंडे
  • कौशल्य विकास : राजेश टोपे
  • अल्पसंख्याक : जितेंद्र आव्हाड
  • गोंदिया पालकमंत्री : प्राजक्त तनपुरे
बातम्या आणखी आहेत...