आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अनेक नेतेमंडळींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसवर सनसनाटी आरोप केले आहे. शरद पवारांनी काँग्रेसला ताकत दिलेली ताकत पाहता तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार होते पण दिल्लीच्या 'दरबार राजकारणात' ही संधी हुकली. ज्यामुळे त्यांच्यासह काँग्रेस आणि देशाचे मोठे नुकसान झाले, असे पटेल यांनी म्हटले. त्यांनी आज इंग्रजी दैनिक हितवादसह अनेक वर्तमानपत्रात पवारांवर लिहिलेल्या लेखात शरद पवार यांच्या पंतप्रधान पदाविषयी महत्वाचे भाष्य केलं आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी लेखात म्हटले की, काँग्रेसची काम करण्याची पद्धत 'सुनियोजित बंड' घडवून आणणे, आपल्या पक्षात स्वतःच क्षेत्रीय नेतृत्वाला कमजोर करण्याचा प्रयत्न करणे अशी आहे. जे पवारांसोबतही केले गेले. पहिला फटका पवारांना 1989 ला आर के धवन, माखनलाल फोतेदार यांनी मोठे षडयंत्र करून देण्याचा प्रयत्न केला जो पवारांनी फोल पाडला, असेही पटेल
या लेखात पुढे ते म्हणाले की, राजीव गांधींच्या हत्येनंतर फक्त पवारांना दूर ठेवणे या एका अजेंड्यासाठी नरसिंह राव यांना आणले. देशभर काँग्रेसला पवार हवे होते. 1996 साली शरद पवार पंतप्रधान असणारे काँग्रेस सरकार बनले असते पण नरसिंह रावांमुळे देवेगौडा सरकार आले. माझ्या घरातून ह्या घडामोडी होत होत्या, मी अधिकाराने हे सांगू शकतो, असा दावा देखील प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
पटेल म्हणताता की, फक्त पवारांमुळेच वाजपेयी सरकार 13 दिवसांत पडले. पण तरीही त्यांना मिळायला हवे होते ते स्वातंत्र्य काँग्रेसने त्यांना दिले नाही. त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने काँग्रेस ने अपमान केला. पार्लियामेंटरी पार्टीचे मुख्य बनवून त्यांनाच अंधारात ठेवले जायचे. महाराष्ट्रात आणि केंद्र स्तरावर त्यांच्या नेतृत्वाचा अपमान करणाऱ्या सतत गोष्टी घडवल्या जायच्या, असे आरोप देखील प्रफुल्ल पटेल यांनी या लेखातून केले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.