आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीकास्त्र:''राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला' असे म्हणताना देवेंद्रजी आपण चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात, कारण...' रोहित पवारांचा फडणवीसांना टोला

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनेने कोकणाला भरभरून दिले, मात्र या (महाविकास आघाडी) सरकारने कोकणाला काय दिले - फडणवीस

शिवसेनेने कोकणाला भरभरून दिले, मात्र कोकणाला या सरकारने काय दिले? विदर्भाला फक्त 16 कोटी रुपये दिले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले आहे. मात्र सरकार दिसतेय कुठे? असा सवाल करत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला केला होता. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवारांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. 'राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला' असे म्हणताना चुकून पंतप्रधानांऐवजी तुम्ही मुख्यमंत्री म्हणालात,' असे म्हणत देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

रोहित पवारांनी ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला' असं म्हणताना देवेंद्र फडणवीस साहेब आपण चुकून पंतप्रधान ऐवजी मुख्यमंत्री म्हणालात... कारण ही म्हण केंद्र सरकारला तंतोतंत लागू होतेय... पण आता येत्या #GST कौन्सिलच्या बैठकीनंतर तरी हाती भोपळा न देता राज्याला हक्काचा निधी द्यावा, ही अपेक्षा.' असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते...
'शिवसेनेने कोकणाला भरभरून दिले, मात्र या (महाविकास आघाडी) सरकारने कोकणाला काय दिले विदर्भाला केवळ 16 कोटी रूपये दिले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले असून सरकार दिसतेय तरी कुठे? असा सवाल फडणवीसांनी विचारला होता. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले आहे पण सरकार आहे तरी कुठे? मागील वर्षी पिकले ते खरेदी केले नाही. आम्ही सत्तेत असताना प्रोफेशनल शेतकरी नेते रस्त्यावर उतरत होते. आता ते आता कुठे गायब झाले आहेत? लबाडी काय असते हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसकडून शिकावे, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी टीका केली होती.