आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिकांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. आज सकाळी अचानक त्यांना चौकशीसाठी नेण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादीकडून निषेध व्यक्त केला जात आहे. आता त्यावर आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक हे सातत्याने बोलत आहेत. ते सत्य बोलत असल्याने चौकशीच्या नावाखाली ईडीकडून हा त्रास देण्यात येत आहे असे रोहित पवार म्हणाले. तसेच ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असून या कारवाईचे थेट यूपी निवडणुकांची संबंध असल्याचा संशय देखील रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
या कारवाईविषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, 'भाजपने राजकारण करून ही कारवाई केली आहे. तरीही ही इतर पक्षाच्या नेत्यांसाठी धोक्याची घंटा नाही तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. याविरोधात भाजपविरोधी सर्व पक्ष एकवटणार आहे. अशी माहिती रोहित पवारांनी दिली. पुढे ते म्हणाले की, मलिकांनी महाराष्ट्रातील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले आहेत. यामध्ये भाजपचे काही पदाधिकारी उघडकीस आणले आहेत. येथे उघड झालेलं रॅकेट गुजरातपर्यंत जाईल असे वाटत असेल, त्यामुळे कारवाई झाली असेल असा संशय देखील रोहित पवारांनी व्यक्त केला. तसेच गुजरातमध्ये देखील 22 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे ड्रग सापडले. आज संध्याकाळी मलिक बाहेर आल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल. असे रोहित पवारांनी स्पष्ट केले.
यूपी निवडणुकांशी कारवाईचा थेट संबंध?
रोहित पवारांनी मलिकांवरीलल कारवानंतर संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, 'मलिक यांच्याविरोधात ईडीने जी कारवाई केली आहे, त्याचा उत्तर प्रदेशातील निवडणुकांशी थेट संबंध असू शकतो. कारण आज उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यामध्ये भाजपचे मौर्यांसारखे मोठे नेते आहेत. त्यांचे ते कार्यक्षेत्र आहे. गेल्या अनेक टप्प्यांमध्ये समाजवादी पार्टीला त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपचे जे छोटे नेते आहेत, ते उत्तर प्रदेशात भाजपला सहकार्य करत नाहीत, असं दिसतेय. त्यामुळे कदाचित उत्तर प्रदेशातील लोकांना एक संदेश द्यायचा असेल की महाराष्ट्रात एका मोठ्या नेत्याला आम्ही विदाउट नोटीस ताब्यात घेऊ शकतो. त्यामुळे जे राहिलेले जे मतदान असतील, त्यात आमचे नीट ऐका, अन्यथा उत्तर प्रदेशातही आम्ही कारवाई करू शकतो.' असा संदेश द्यायचा असू शकतो. यामुळे मलिकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.