आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद दौरा:...म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच ठिकाणी बसले आहेत आणि मी महाराष्ट्रभर फिरतोय, शरद पवारांनी सांगितले कारण

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. आता या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार हे राज्यभरात फिरत आहेत. ते राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात एकही दौरा केलेला नाही. ते एका ठिकाणी बसूनच राज्यातील कामकाज पाहत आहेत. यावर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. आता यावर शरद पवार यांनी यामागिल कारण सांगितले आहे. औरंगाबाद कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पवार आज शहरात आले आहेत.

...म्हणून मुख्यमंत्री एकाच ठिकाणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. शरद पवार हे 80 वर्षांचे असूनही राज्यभरात फिरत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी एकही दौरा केलेला नाही. लातूरात भूकंप आला होता तर पवारांनी मुख्यमंत्री कार्यालय लातूरात हलवलं होतं. परंतु आता मुख्यमंत्र्यांवर टीका होत आहे की, मुख्यमंत्री कुठेही जात नाही. असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, लातूरचा जो भूकंप होता, तर तो एका जिल्ह्याचा भाग होता. आताचं संकट हे संपूर्ण राज्यातील आहे. यामुळे मुख्यमंत्री एकाच भागात जाऊन बसले तर, निर्णय प्रक्रियेत अडचणी निर्माण होतील. यामुळे कॅप्टनने मुख्य ठिकाणी बसून सर्वांवर लक्ष ठेवावे, जी कमतरता असेल ती सांगावी. असा आमचा आग्रह आहे. आता पालकमंत्री इथून गेले तर ते मुख्यमंत्री आणि त्यांच्या संबंधीत गोष्टींशी चर्चा करतील. हीही कमतरता आहे ती पूर्ण करा. मी देखील मुख्यमंत्र्यांना भेटून कमतरतांविषयी सांगेल. यामुळे त्यांनी एका ठिकाणी बसून लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले

...म्हणून राज्यभर दौरे करताय पवार

शरद पवार 80 वर्षांचे आहे. तरीही ते राज्यभरात दौरे करत आहेत. राज्यातील अनेक भागांना भेटी देत आहे. यामागचे कारणही त्यांनी सांगितले आहे. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणे महत्त्वाचे आहेच. यासाठी मी फिरतोय कारण मला करमत नाही, मला एका जागेवर बसवत नाही. मी सतत लोकांमध्ये फिरणारा माणूस आहे. मला लोकांशी बोलत राहण्याची सव आहे. यामुळे मी फिरतो. जिथे संकट आलं तिथे मी जातो. चौकशी करणं, मदत करणं, या भावनेतून मी फिरतोय. असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

औरंगाबादच्या परिस्थितीविषयी काय बोलले

औरंगाबादमध्येही कोरोनाची स्थिती चिंताजनक असून आवश्यक ते उपाय योजले गेले पाहिजेत असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच येथे बेड्सची संख्या वाढवण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. कोरोना कमी व्हावा यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ज्या ज्या सुचना येतील. त्याची अंमलबजवणी करायला लोकांनी सहकार्य करायला पाहिजे. या सर्व बाबतीत सर्वांनी सहकार्य करायला हवं. आज औरंगाबाद शहर आणि ग्रामिण या दोन्हीही ठिकाणी लोकांची सहकार्याची भूमिका आहे. आपण लवकरच संकटावर मात करु अशी खात्री आहे. असंही पवार म्हणाले.