आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांचा काँग्रेसला टोला:जुनी जमीनदारी संपली असली, तरी उरलेला राजवाडा सांभाळता येईना अशी काँग्रेसची अवस्था

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय म्हणाले शरद पवार?

काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शदर पवारांनी जोरदार टोला लगावला आहे. ते म्हणाले की, काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात. आता जुनी जमीनदारी संपली असली, तरी उरलेला राजवाडा कसा सांभाळावा हे समजत नाही अशी अवस्था काँग्रेस पक्षाची झाली असल्याचा घणाघात शरद पवारांनी यावेळी केला.

शरद पवार इंडिया टूडे गृपच्या मुंबई तकला दिलेल्या एका मुलाखतीत बोलत होते. पत्रकारांनी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारल्यानंतर पवारांनी यावर भाष्य केले. परंतु, यावर काँग्रेस काय प्रत्युत्तर देईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.

काय म्हणाले शरद पवार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुलाखतीदरम्यान एक किस्सा सांगत काँग्रेसवर जोरदार टोला लगावला. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशातील जमिनदारांकडे मोठ्या प्रमाणात जमीनी आणि राजवाडे होते. परंतु, कमाल जमीन धारणा कायदा आल्याने त्यांच्याजवळील जमीनी गेल्या आणि राजवाडे किंवा हवेली तशाच राहिल्या.

जमिनदारांना आता आपली हवेली दुरस्त करण्याची ताकदसुद्धा राहिली नाहीत. त्यांच्याजवळ आता केवळ 10-15 एकर जमीनी आहेत. परंतु, त्यांना वाटते की, हे समोर शेतीत दिसणारे पीक आपलेच आहेत. अशी अवस्था काँग्रेसच पक्षाची झाली असल्याचे शरद पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...