आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राम मंदिर भूमिपूजन:लोकशाही व्यवस्थेत धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी राममंदिर भूमिपूजनाला सहभागी होऊ नये, राष्ट्रवादीच्या नेत्याचं मुख्यमंत्र्यांना अवाहन 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना राजकारणही तापलेले दिसतेय. अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण आले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजित मेमन यांनी मुख्यमंत्र्यांना या मुद्द्यावरुन घेरले आहे. लोकशाही व्यवस्थेत धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी राममंदिर भूमिपूजनाला सहभागी होऊ नये असे ट्विट त्यांनी केले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला जाणार असल्याच्या सर्वत्र चर्चा आहेत. मुख्यमंत्र्यांना निमंत्रण मिळाल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. दरम्यान संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव टाकरेंना राम मंदिर भूमिपूजनासाठी निमंत्रणाची गरज नसल्याचा टोला लगावला. अशात राष्ट्रवादीला मात्र हे पटलेलं दिसत नाही. माजी खासदार माजिद मेमन यांनी मात्र त्याला आक्षेप घेतला आहे. धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळ्याला जाणं टाळावं असं म्हटलं आहे. त्यामुळे राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत मतमतांतर असल्याचं समोर आलं आहे.

माजिद मेमन यांनी ट्विट केलंय की, उद्धव ठाकरे यांनाही राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना या सोहळ्याला हजर राहायचे की नाही हा त्यांचा वयक्तिक निर्णय आहे. मात्र, लोकशाही व्यवस्थेत धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊ नये' असं म्हटलं. यानंतर महाविकास आघाडीमुळे राममंदिर मुद्द्यावरुन मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भूमिपूजनासाठी जातात की, नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.