आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकाएकी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यच नव्हे तर देशभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी शहरा-शहरांतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. अशात एका कार्यकर्त्याने तर आपल्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहित आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली आहे.
'आपण निर्णय बदलला पाहीजे'
पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काळे यांनी शरद पवार यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. या पत्रात संदीप काळे यांनी म्हटले आहे की, 'साहेब, तुम्ही घेतलेला हा निर्णय कोणालाच मान्य नाही. तुमच्या निर्णयाने आम्ही पोरके झालो आहोत. तुम्ही आमच्यासाठी देव आहात. आपण निर्णय बदलला पाहिजे'.
शरद पवारांकडून निर्णयाचा फेरविचार
शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच राज्यातील नेते आणि कार्यकर्ते भावुक झाले. सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करण्यात येत आहे. यासोबतच पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांचा दबावही पवारांवर निर्माण होत आहे. त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नेते, कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावामुळे निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी मला दोन, तीन दिवस द्या. तोपर्यंत शांत रहा, अशा शब्दांत शरद पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली आहे.
सोलापूरच्या कार्यकर्त्यांना भावना अनावर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक कार्यकर्त्यांनी सत रस्ता येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येऊन घोषणाबाजी केली. पवार साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वार साहेबांनी राजीनामा मागे न घेतल्यास सामूहिक राजीनामे देण्यावर एकमत झाले. तसा ठराव करून प्रदेशपातळीवर पाठविण्यात आल्याचे सोलापूरच्या शहर अध्यक्षांनी सांगितले.
धाराशिवला पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यातील पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देऊन ते प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्याकडे पाठवले. प्रदेशाध्यक्षांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. शरद पवार यांच्या निर्णयानंतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना तीव्र धक्का बसला आहे. पवार यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्र राज्य व देशाला आजच्या कठीण काळात अत्यंत आवश्यक्ता आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसलाही संघटनात्मक उर्जा मिळण्यासाठी वरिष्ठ उर्जा स्रोत म्हणून पवार यांनीच अध्यक्षपदी राहावे, अशी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी आहे.
जळगावात राष्ट्रवादीचा काम न करण्याचा इशारा
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याबाबत केलेल्या घोषणेचे पडसाद जिल्ह्यातही उमटले आहेत. हा निर्णय मागे न घेतल्यास जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजीनामे देतील. राष्ट्रवादीचे काम करणार नाही, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पवार यांचा निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यांनी तो निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.
आमदारकीचा राजीनामा देणार : अनिल पाटील
शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी केली आहे. त्यांनी निर्णय मागे न घेतल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
संबंधित वृत्त
जाणून घ्या.. ‘पॉवर प्ले’चा अर्थ:मविआत फूट अटळ, राष्ट्रवादीचा सत्तेजवळ जाण्याचा मार्ग मोकळा; कुणावर काय परिणाम?
राष्ट्रवादी काँग्रेस : नवा पक्षाध्यक्ष मिळेल, भाजपशी युतीची शक्यता आणखी बळावलीअर्थ : सुप्रिया की अजित यापैकी होईल अध्यक्ष. शरदराव यांची पसंती सुप्रियाला. समितीही तसा कौल देऊ शकेल.परिणाम : पवारांनी बाजूला होत भाजपशी युतीचा अडसर केला दूर. केंद्र व राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादीचा सहभाग शक्य.
महाविकास आघाडी : वज्रमूठ ढिली पडेल, उर्वरित दोन्ही पक्ष एकाकी पडू शकतीलअर्थ : पवार हेच आघाडीचे आधारस्तंभ होते. राष्ट्रवादी आता वेगळ्या भूमिकेत गेली तर मविआत फूट अटळ.परिणाम : मोदींशी लढण्याच्या मनसुब्यावर पाणी पडेल, भाजपविरोधात राज्यात प्रबळ विरोधक राहणार नाहीत. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.