आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त पोस्ट:'बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची वेळ'; पवारांना दिलेल्या धमकीवर राष्ट्रवादीची सायबर सेलमध्ये तक्रार, तरुण अटकेत

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना ट्विटवरून दिलेल्या धमकीवर राष्ट्रवादीकडून सायबर सेलमध्ये तक्रार करण्यात आली होती. यानंतर नाशिक पोलिसांनी कारवाई करत संबंधित तरुणाला अटक केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी ही तक्रार दाखल केली होती. शरद पवारांना धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलचा शोध घेवून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.

राष्ट्रवादी नेते सुरज चव्हाण यांनी ट्विट करून म्हटले होते की, नथुराम तयार करण्याची फॅक्टरी कुणाची आहे? याची चौकशी झाली पाहीजे, ही मागणी महाराष्ट्र सायबर सेल विभागाकडे केली. तसेच 107, 153 अ, 504, 506 व माहिती तंत्रज्ञान कायद्यातंर्गत कायदेशीर कारवाई करुन अशा विकृतांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले होते.

राष्ट्रवादीची सायबर सेलकडे तक्रार
राष्ट्रवादीची सायबर सेलकडे तक्रार

आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात निखिल भामरे या माथेफिरूने धमकी देणारे ट्विट केले होते. "बारामतीच्या गांधीला संपविण्यासाठी बारामतीत नथुराम गोडसे तयार व्हावा", असे विकृत ट्विट करुन या माथेफिरून थेट हत्या करण्याची भाषा वापरली होती. त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी सुरज चव्हाण यांनी केली होती.

जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट -
शरद पवार यांच्याविषयी केलेल्या ट्विटवर जितेंद्र आव्हाड यांनी रिट्विट केले. ते म्हणाले की, काय पातळीवर हे सगळे गेले आहेत, या विकृत इसमाविरुद्ध कडक कारवाई करा, असे म्हणत त्यांनी हे ट्विट मुंबई पोलिस, पोलिस महासंचालक, पुणे पोलिस आणि ठाणे पोलिसांना टॅग केले.

पवारांवर केतकीच्या टिकेला सुरज चव्हाण यांचे उत्तर
केतकीला तिच्याच स्टाईलमध्ये उत्तर हीने फेसबुक अकाउंटवर अ‍ॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या एका व्यक्तीने लिहिलेली एक कविता शेयर करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केली. यावर सूरज चव्हाण यांनी तिला उत्तर दिले आहे. सूरज चव्हाण यांनी ट्विट करत दोन ओळींमध्येच केतकीवर बोचरी टीका केली आहे. चव्हाण यांनी ट्विट केले की, नको करू एवढे पाप I शेवटी पवार साहेबचं तुझा बापII चितळेंची चाले फक्त भाकरवाडी I केतकी तर चार आण्याची पुडी Iअशा ओळी पोस्ट करत त्यांनी केतकीला धारेवर धरले.

बातम्या आणखी आहेत...