आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापेट्रोल आणि डिझेलवरील तोटा कमी करण्यासाठी तेल कंपन्यांनी डिझेलच्या खरेदीवर प्रति लिटर २५ रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ फक्त मोठ्या प्रमाणात खरेदी करणारे, जसे की बस ऑपरेटर आणि मॉल्समध्ये वापरण्यासाठी खरेदी केलेल्या डिझेलवर करण्यात आली आहे. सध्या तरी किरकोळ दरात कोणतीही वाढ झालेली नाही. घाऊक खरेदी करणाऱ्या कंपन्या, आस्थापने, उद्योग यांना डिझेल खरेदी करताना आता प्रति लीटर 25 रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी थेट मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी राज्य सरकार तसंच पालिकेच्या बसेसना डिझेलच्या वाढलेल्या दरातून दिलासा देण्याची मागणी केली आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये होत असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता, केंद्र सरकारने घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात प्रति लिटर 25 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाचा सरकारी आणि महानगरपालिका परिवहन सेवांवर आर्थिकदृष्ट्या विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींना निवेदनाद्वारे देशातील राज्य सरकार आणि महापालिका परिवहन बसेसना डिझेल दरवाढीतून सूट देण्याबाबत विनंती केल्याची माहती टि्वट करत महेश तपासे यांनी केली आहे.
काय म्हटलं पत्रात?
रशिया-युक्रेमधील वादामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असल्याने तुमच्या सरकारने घाऊक खरेदीदारांसाठी डिझेलचा दर प्रति लीटर २५ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने मी तुम्हाला यामध्ये मोडणाऱ्या राज्य सरकार तसंच पालिकेच्या बससेसला वाढलेल्या दरातून दिलासा देत वगळावं अशी विनंती करतो. कारण, राज्य तसंच पालिकेच्या बसेसचा समावेश घाऊक खरेदीदारांमध्ये केल्याने राज्य तसंच पालिकेच्या बससेवेवर मोठा परिणाम होईल, असे तपासे यांनी पत्रात म्हटलं आहे.
ठोक ग्राहकांसाठी डिझेल महागले -
ठोक ग्राहकांसाठी डिझेल २५ रुपये प्रतिलिटर महाग झाले आहे. पेट्रोलियम कंपन्यांद्वारे डिझेल घाऊक प्रमाणात थेट मोठमोठे बस-ट्रक ऑपरेटर व मॉल यांना विकले जाते. दिल्ली व मुंबईत ठोक किंवा औद्योगिक ग्राहकांसाठी डिझेलचा दर २५ रुपयांनी वाढून अनुक्रमे ११५ रुपये व १२२.०५ रुपये लिटर झाला.बस ताफ्यांचे ऑपरेटर आणि मॉल यांसारख्या ठोक ग्राहकांनी पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदी केले आहे. सामान्यत: ते पेट्रोलियम कंपन्यांकडून थेट इंधन खरेदी करतात. त्यामुळे इंधनाची किरकोळ विक्री करणाऱ्या कंपन्यांचे नुकसान वाढले आहे. सर्वाधिक फटका नायरा एनर्जी, जिओ-बीपी आणि शेल यांसारख्या कंपन्यांना बसला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.