आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सूरू आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून मलिकांची चौकशी सुरू आहे. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ईडीच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. ईडीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी व घोषणाबाजी करण्यात येत आहे.
आज सकाळी 7.45 वाजेपासून नवाब मलिकांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. अंडरवर्ल्डशी संबधित जमीन खरेदी व्यवहाराप्रकरणी मलिकांची विचारपूस करण्यात येत आहे. त्यामुळे मलिकांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरची आज ईडी कोठडी संपणार आहे. त्यापूर्वी मलिकांना ईडीने चौकशीसाठी नेले आहे. मिळालेल्या माहितीनूसार, इकबाल कासकरने चौकशी दरम्यान, नवाब मलिकांचे नाव घेतल्याचे कळते. ईडी सध्या दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी करत आहे. याचप्रकरणी कासकरला सात दिवस ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, कासकर आणि मलिक या दोघात झालेल्या जमीन व्यवहाराचे काही पुरावे ईडीला मिळाले आहेत. याचप्रकरणी मलिकांची चौकशी सुरू आहे.
ईडीच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन, कार्यकर्ते दाखल
ईडीच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन करण्यात येत असून, यावेळी कोणीही पदाधिकारी किंवा बडे नेते उपस्थित नव्हते. ईडीच्या कोठडीत असलेला दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरने नवाब मलिक यांचे नाव घेतले असल्याचे समोर आले. त्यानंतर ईडीचे पथक नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले. नवाब मलिक यांची चौकशी ज्यासाठी ईडीने सुरू केली आहे, ते प्रकरण दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ इकबाल कासकर याच्याशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीने याआधीच ताब्यात घेतले आहे. या चौकशीत त्याच्याकडून महत्त्वाची माहिती हाती लागली. नवाब मलिक यांच्या भावाला मंगळवारी ईडीने समन्स पाठवल होते. त्यानंतर आज पहाटे 5 ते 6 दरम्यान नवाब मलिक यांच्या कुर्ला या निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचले होते. त्यानंतर नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात स्वत: हून येण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक हे ईडी अधिकाऱ्यांसोबत घरातून निघाले. त्यानंतर गेल्या तीन तासांपासून नवाब मलिकांची चौकशी सुरू आहे. कार्यकर्ते देखील आक्रमक झाले असून, ईडीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आंदोलन करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.