आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक उद्या दुपारी बोलावली आहे. या बैठकीत ओबीसी आरक्षण आणि आगामी पालिका व राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठकीत राष्ट्रवादीचे सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत.
राज्याचे अन्न पुरवठा मंत्री मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत, असे म्हणत असले तरी प्रभाग रचना जाहीर होत आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकांची रणनिती आखण्यास राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. याबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
मलिक, देशमुख मतदान करणार?
राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 10 जुनला मतदानाची प्रकिया पार पडणार आहे. असे असताना राष्ट्रवादीचे दोन आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख सध्या कारागृहात आहेत. या निवडणुकीत त्यांना मतदान करता यावे, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे दोघांना निवडणुकीसाठी मतदान करता यावे यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये छगन भुजबळ यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी कारागृहात असताना मतदान केले होते. यावेळी रामनाथ कोविंद राष्ट्रपती म्हणून निवडून आले होते.
मोठ्या घोषणेची शक्यता
बैठकीत मुंबई मनपासह इतर महत्वाच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी शरद पवार काय निर्णय घेता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजपने ओबीसी आरक्षण नसल्यास निवडणुकीत 27 टक्के ओबीसी उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. अशाच पद्धतीचा एखादा निर्णय घेण्याबाबतही बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.