आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील राजकीय वर्तुळात सध्या हिंदुत्त्वावरुन वातावरण तापलेले दिसत आहे. मनसेने हिंदुत्त्वाचा मुद्दा सध्या लावून धरला आहे. यासोबतच त्यांनी आयोध्या दौऱ्याची घोषणा देखील केली आहे. त्या पाठोपाठ शिवसेना नेत्यांनी देखील अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. मात्र हे सर्व राजकीय नाट्य सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार हे अयोध्येत पोहोचले आहेत. त्यांच्या या राजकीय दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहित पवार हे सध्या सहकुटुंब तीर्थयात्रेला गेलेले आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या आहेत. या यात्रेदरम्यान काल त्यांनी राजस्थानमधील राधा गोविंद मंदिराला भेट दिली. या मंदिरासंदर्भात त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. त्यानंतर पुष्करचं ब्रह्म मंदिर, सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा अजमेर इथला दर्गा येथेही रोहित पवारांनी भेट दिली आहे. या ठिकाणी आपण देशाच्या आणि राज्याच्या कल्याणासाठी प्रार्थना केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. चार दिवसाच्या या राजस्थान दौऱ्यानंतर आता रोहित पवार पुढे उत्तर प्रदेश दौऱ्यावर निघाले आहेत. आपल्या परिवारासोबत या दौऱ्यादरम्यान पवार आज अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
रोहित पवारांनी फेसबुक पोस्टमध्ये नेमके काय?
रोहित पवारांनी लिहिले की, 'हिंदू धर्मातील सर्वांत महत्त्वाचं तिर्थक्षेत्र कोणतं असेल तर ते गंगा नदीच्या तीरावर वसलेलं वाराणसी. मुक्ती आणि शुद्धीकरणासाठी देशभरातून असंख्य भाविक इथं नियमित येत असतात. वृंदावन आणि मथुरेला भेट दिल्यानंतर आम्हीही वाराणसीमध्ये आलो. वाराणसी हे हिंदू धर्मासाठी सात पवित्र शहरांपैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे. प्रसिद्ध संत कबीर यांचीही जन्मभूमी वाराणसी आहे. इथं अनेक विशाल मंदिरांव्यतिरिक्त, घाट आहेत. हे स्थळ केवळ भारतीयांसाठीच नाही तर परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचंही केंद्रबिंदू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.