आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचा पलटवार:आधी पूर्ण माहिती घ्या मग आरोप करा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या पटोलेंवर राष्ट्रवादीचा पलटवार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपल्या पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घ्यावी

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या पाळत ठेवण्याच्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसने पलटवार केला आहे. नाना पटोले यांनी केलेले सर्व आरोप माहितीअभावी आहे. त्यांनी आधी व्यवस्थेची माहिती घ्यावी, आपल्या पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेऊनच आरोप करावे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे. पटोले यांच्या त्या आरोपावर मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

सरकार कोणाचेही असो पोलिसांना माहिती ठेवावीच लागते
राज्यातील आंदोलने, राजकीय पक्षांच्या सभा, मोर्चा, दौरे आणि मंत्र्यांचे दौरे याची माहिती पोलिसांना ठेवावी लागते. ते काय आघाडी सरकारमध्येच घडत नाहीये. सरकार कोणाचेही असले तरी पोलिसांनी याची माहिती ठेवावीच लागते. त्यामुळे आधी माहिती घेऊनच आरोप करावे असा टोला मलिक यांनी लगावला आहे.

आपल्या पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घ्यावी
जर पटोले यांना या व्यवस्थेबाबत माहिती नसेल तर आरोप करण्यापूर्वी पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती करुन घ्यावी मगच आरोप करावे. आपल्या पक्षात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यासारखे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून माहिती घेऊनच पटोले यांनी आरोप करावे असे मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काय म्हणाले होते पटोले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे. ते आज लोणावळ्यातील काँग्रेसच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे असल्याने ते मला सुखाने जगू देणार नाही असा टोलाही पटोले त्यांनी यावेळी लगावला आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...